शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बापरे! एनर्जी ड्रिंकचं व्यसन पडलं महागात, दिवसाला प्यायचा असंख्य कॅन; झाली भयंकर अवस्था अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 19:55 IST

Energy drinks : एका व्यक्तीसाठी एनर्जी ड्रिंक जीवघेणं ठरलं आहे. एनर्जी ड्रिंक पिणं त्याला चांगलंच महागात पडलं असून त्याचा मृत्यू झाला आहे. 

आजकाल बाजारात एनर्जी ड्रिंकची मागणी (Energy drinks) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बरेच ते अत्यंत आवडीने पितात. एनर्जी ड्रिंक हे कोल्ड ड्रिंकसारखंच असतं पण यामध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असतं, जे एकप्रकारचं केमिकल कम्पाऊंड असतं. जास्त प्रमाणात कॅफिन शरीरासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे ब्रिटनमधील एका व्यक्तीसाठी एनर्जी ड्रिंक जीवघेणं ठरलं आहे. एनर्जी ड्रिंक पिणं त्याला चांगलंच महागात पडलं असून त्याचा मृत्यू झाला आहे. 

द सन वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, 25 वर्षांच्या जस्टिन बार्थोलोम्यू (Justin Bartholomew) याला एनर्जी ड्रिंक पिण्याचं व्यसन लागलं होतं. यातच त्याचा मृत्यूच झाला. रिपोर्टनुसार लग्नानंतर फक्त तीन महिन्यांतच त्याचा घटस्फोट झाला, त्यामुळे तो खचला होता. डिप्रेशनमध्ये गेला. स्वतःला बिझी ठेवण्यासाठी आणि इतर मेहनतीची कामं करण्यासाठी तो दररोज रेड बुलसारखी एनर्जी ड्रिंक प्यायचा. पण हळूहळू त्याला एनर्जी ड्रिंकचं व्यसन लागलं.

जस्टिनच्या वडिलांनी वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, त्याला एनर्जी ड्रिंकचं असं व्यसन लागलं जसं लोकांना ड्रग्सचं लागतं. वडिलांनी आणि त्याच्या भावंडांनी त्याला एनर्जी ड्रिंक सोडण्यासाठी खूप समजावलं पण तरी तो ते सोडू शकला नाही. फॅब डेलीच्या रिपोर्टनुसार जास्त एनर्जी ड्रिंक प्यायल्यानेच त्याचा मृत्यू झाला आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या रिपोर्टनुसार ब्रिटेनमध्ये तीनपैकी एक मुलगा आठवड्याला एकदा तरी एनर्जी ड्रिंक पितो. 

एनर्जी ड्रिंकचे खूप दुष्परिणाम आहेत. जास्त प्यायल्याने ब्लड प्रेशर वाढतं, झोप लागण्यात समस्या येते, डोकं दुखतं आणि पोटातही तीव्र वेदना होतात. जास्त शुगर असल्याने डायबेटिजची समस्याही होऊ शकते. फॅब डेलीच्याच एका रिपोर्टनुसार  इंग्लंडमधील एका व्यक्तीला जास्त एनर्जी ड्रिंक प्यायल्याने हार्ट अटॅक आला होता. तर तीन मुलांची आई एनर्जी ड्रिंकच्या व्यसनामुळे एकाच दिवसात 15 लीटर एनर्जी ड्रिंक पिऊ लागली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके