शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खऱ्या अर्थाने सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याचा बर्गर फ्री मध्ये, फक्त अट एकच, जाणून घ्या कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 19:16 IST

आता सोन्याचा बर्गर म्हणजे त्याची किंमतही जास्तच नाही का? आणि त्यामुळे मग असा बर्गर खाण्याची इच्छा तुम्ही मारत असाल तर तसं बिलकुल करू नका. तुमच्या खिशाला परवडत नसेल तर आता हा असा बर्गर मोफत खाण्याची सुवर्णसंधी आहे (Food challenge).

बर्गर (Burger) म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. विचार करा जर तो बर्गर सोन्याचा (Gold Burger) असेल तर खाण्याची इच्छा अधिकच वाढेल नाही नाही. आता सोन्याचा बर्गर म्हणजे त्याची किंमतही जास्तच नाही का? आणि त्यामुळे मग असा बर्गर खाण्याची इच्छा तुम्ही मारत असाल तर तसं बिलकुल करू नका. तुमच्या खिशाला परवडत नसेल तर आता हा असा बर्गर मोफत खाण्याची सुवर्णसंधी आहे (Food challenge).

तुम्ही तर खवय्ये असाल, फूड लव्हर असाल तर तुम्ही वेगवेगळ्या फूड ऑफर्सचा लाभ नक्कीच घेत असाल (Food offers). अशीच एक फूड ऑफर सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होते आहे. ती म्हणजे सोन्याचा बर्गर खाण्याची. हा बर्गर तुम्हाला मोफत खायला मिळणार आहे. पण त्यासाठी एक अट आहे. म्हणजे फूड चॅलेंजअंतर्गत तुम्हाला हा बर्गर फ्रीमध्ये खायला मिळेल. फूड चॅलेंज म्हणजे एका विशिष्ट वेळेत तुम्हाला विशिष्ट मर्यादेत पदार्थ खायचे असतात.

आता हे फूड चॅलेंज कोणत्या फूड चैन कंपनीचं नाही. तर पंजाबच्या लुधियानामध्ये असलेल्या बाबा जी बर्गरच्या स्ट्रीट वेंडरने दिलं आहे. ज्याने तब्बल एक हजार रुपयांचा बर्गर फ्रीमध्ये खायला देण्याची ऑफऱ दिली आहे. सही है युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा बर्गर आपण एरवी खात असलेल्या बर्गरप्रमाणेच आहे, पण त्या बर्गरपेक्षा तो वेगळा आहे. या बर्गरमध्ये खास आहे ते सोनं. या बर्गरवर सोन्याचा वर्क चढवलेला आहे आणि तो आकारानेही खूप मोठा आहे. त्यामुळे याची किंमत खूप आहे.

जर एखाद्या व्यक्तीने एकट्याने हा बर्गर ५ मिनिटांत पूर्ण संपवला तर त्याला हा बर्गर मोफत दिला जाईल. त्याने बर्गर खाण्यासाठी दिलेले पैसे त्याला परत केले जातील. सोबतच तुम्हाला एक हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जातील, असं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके