लग्न पाहावं करून, लग्न एकदाच होतं, अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. शादी ऐसा लड्डू है, जो खाये वो पछताए और ना खाए वो भी पछताए, असंही तुम्ही ऐकलं असेल. पण पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये एक तरूण एकदा नव्हे, तर चौथ्यांदा लग्न बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे तो सध्या त्याच्या तीन पत्नींसह आनंदात राहतोय आणि त्याहून विशेष म्हणजे या तिन्ही पत्नी आपल्या पतीसाठी चौथ्या मुलीचा शोध घेताहेत.सियालकोटमध्ये वास्तव्यास असणारा अदनान सध्या चौथ्या विवाहासाठी मुलगी शोधतोय. अदनानचं वय सध्या २२ वर्षे आहे. वयाच्या १६ व्या वर्षी विद्यार्थी असताना त्याचा पहिला निकाह झाला. त्यानंतर चौथ्या वर्षी त्यानं पुन्हा निकाह केला. तर गेल्याच वर्षी त्यानं तिसरा निकाह केला. आता अदनान चौथ्या निकाहाच्या तयारीत आहे. त्यासाठी मुलीचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे अदनानच्या तिन्ही पत्नी यामध्ये त्याला मदत करताहेत.
VIDEO: २२ वर्षांचा तरुण करतोय चौथ्या लग्नाची तयारी; तीन बायकांसह घेतोय चौथीचा शोध
By कुणाल गवाणकर | Updated: November 19, 2020 23:10 IST