शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी मुलगा बनून तरूणींसोबत करत होती रोमान्स, पोलखोल झाली तेव्हा सगळे झाले हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:29 IST

सगळ्यांना ती मुलगाच वाटत होती. पण यादरम्यान तिच्या सवयी सुद्धा मुलांसारख्या झाल्या होत्या. ती मुलींसोबत रोमान्स करू लागली. पण जेव्हा याची पोलखोल झाली तेव्हा कोर्टाने अजब निर्णय दिला. 

जगभरात सतत अशा काहीना काही घटना घडत असतात ज्या वाचून सगळेच हैराण होतात. अशीच एक अवाक् करणारी घटना समोर आली आहे. 21 वर्षीय एका तरूणीला अचानक तरूणांसारखं दिसण्याची आवड होऊ लागली. नंतर ती मुलांसारखी राहू लागली. त्यांच्यासारखीच कपडे घालू लागली होती. सगळ्यांना ती मुलगाच वाटत होती. पण यादरम्यान तिच्या सवयी सुद्धा मुलांसारख्या झाल्या होत्या. ती मुलींसोबत रोमान्स करू लागली. पण जेव्हा याची पोलखोल झाली तेव्हा कोर्टाने अजब निर्णय दिला. 

ब्रिटनच्या 21 वर्षीय जॉर्जिया बिलहमला काही दिवसांआधी कोर्टात हजर करण्यात आलं. कारण तिच्याबाबत सुनावणी सुरू झाली तेव्हा असं काही समोर आलं की, सगळेच हैराण झाले. समोर आलं की, बिलहम स्वत:ला बर्मिंघमचा जॉर्ज पॅरी सांगत होती. ती एक पुरूष असल्याचं भासवत होती.

स्नॅपचॅटवर तिने एका 19 वर्षीय मुलीला गर्लफ्रेंड बनवलं. तिला फसवलं. इतकंच काय इतरही काही मुलींसोबत तिने असंच केलं. कोर्टात तिने आपली चूक कबूल केली. ती कोर्टात म्हणाली की, मला वाटलं की, माझ्या मैत्रिणींना याचा विश्वास आहे की, मी एक महिला आहे. पण गैरसमज झाला.महिलेच्या आईने सांगितलं की, जॉर्ज बनल्यावर तिची मुलगी खूप आनंदी दिसत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. पण जेव्हा हे समजलं की, तिचे अनेक मुलींसोबत संबंध आहे तेव्हा ती सुद्धा हैराण झाली. 

तरूणीच्या आईने दावा केला की, ती अल्बानियाई गॅगस्टर्स जाळ्यात अडकली होती. 11 मे 2021 ला जॉर्जिया आपल्या आईसोबत कारने जात होती. तेव्हाच एक घटना घडली. पोलिसांनी तिला लायसन्स मागितलं. तेव्हा तिने तिचं खरं नाव सांगितलं. तेव्हाच तिची पोलखोल झाली.

कोर्टाने बिलहमचा हा दावा मान्य केलं की, ती नेहमीच एक टॉमबॉय राहिली आहे. तिला कधीच लिंग बदल करायचा नाहीये. पण तिला मुली आवडतात. त्यांच्यासोबत संबंध ठेवणं तिला आवडत होतं. तिला काही गुन्ह्यांमधून मुक्त केलं. पण एका तरूणीला किस करणं गुन्हा मानत तिला दोषी ठरवलं. आता 19 जुलैला तिला शिक्षा सुनावली जाणार आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेLondonलंडन