शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कमाल! जगातील सगळ्यात जुनं अंड जे 1700 वर्षानंतरही आहे चांगलं, बघा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 11:12 IST

स्कॅन केल्यावर समजलं की, ते पूर्णपणे सुरक्षित आहे. इतक्या वर्षापासून सुरक्षित असलेल्या या अंड्याने सगळ्यांनाच अवाक् केलं आहे.

जर तुम्हाला विचारलं गेलं की, जगातील सगळ्यात जुनं अंड किती वर्ष जुनं असू शकतं? तर तुम्ही यावर काय उत्तर द्याल. कुणी 100 वर्ष म्हणतील तर कुणी 200 वर्ष पण हे बरोबर उत्तर नसेल. कारण आता जगातील सगळ्यात जुनं म्हणजे 1700 वर्ष जुनं अंड सापडलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे अंड पूर्णपणे सुरक्षित आहे. इंग्लंडमध्ये एका प्राचीन वास्तुमध्ये खोदकाम सुरू होतं. तिथे हे अंड सापडलं. जे स्कॅन केल्यावर समजलं की, ते पूर्णपणे सुरक्षित आहे. इतक्या वर्षापासून सुरक्षित असलेल्या या अंड्याने सगळ्यांनाच अवाक् केलं आहे.

इंग्लंडच्या बकिंघमशायरमध्ये ऐलिसबरीच्या बेरीफील्डमध्ये सापडलेल्या या रोमन युगातील अंड्याच्या आत आजही तरल पिवळा आणि पांढरा भाग कायम आहे. हे स्कॅन करण्यात आलं तेव्हा समजलं की, हे अंड 1700 वर्ष जुनं आहे. हे अंड पाण्याने भरलेल्या एका खड्ड्यात सापडलं.

असं मानलं जात आहे की, याच कारणाने हे अंड इतकी वर्ष सुरक्षित राहिलं. जेव्हा हे अंड स्कॅन केलं तेव्हा त्यांना दिसलं की, अंड आतून सुरक्षित आहे. डीजीबी कंजरवेशनच्या पुरातत्ववादी डॅना गुजबर्न ब्राउन म्हणाल्या की, या अंड्याच्या आत हवेचा एक बुडबुडाही आहे.

या बुडबुड्यामुळेच त्यांना समजलं की, आत तरल पदार्थ कायम आहे. त्यांना दिसलं की, अंड हलवलं तर त्यातील बुडबुडाही हलतो. या ठिकाणी अशी चार अंडी सापडली आहेत. पण यातील तीन खोदकाम करताना फुटली. याआधीही अशा ठिकाणांवर अंडी सापडली. पण पहिल्यांदाच असं सुरक्षित अंड सापडलं.

गुडबर्न ब्राउन म्हणाल्या की, अशाप्रकारच्या अंड्यामध्ये जैविक पदार्थही इतका काळ कामय राहू शकत नाही. पण हे फार अजब आहे. असं मानलं जात आहे की, कुणीतरी अंड फार चांगल्याप्रकारे एका बास्केटमध्ये ठेवलं होतं. रोमन समाजात अंड्याला फार महत्व होतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEnglandइंग्लंड