शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १४ श्वानांना इराणच्या तरुणीने घेतले दत्तक; 'ती' म्हणते, हेच माझे कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 10:55 IST

पॉकेटमनीतून भागवतेय खर्च

मनीषा म्हात्रेमुंबई : जिथे घरच्यांना घरातील अंध, अपंग व्यक्ती सहन होत नाहीत, त्याच ठिकाणी इराणची २९ वर्षीय डॉ. राया झंड ही तरुणी मुंबईतल्या रस्त्यावरील १४ अंध, अपंग श्वान दत्तक घेऊन, त्यांच्यासाठी सेवा करताना दिसत आहे. प्राणीप्रेमापोटी वयाच्या बाराव्या वर्षी घर सोडलेली डॉ. राया कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित विभागातील श्वानांसाठी धडपडत आहे.

मूळची इराणची रहिवासी असलेली डॉ. राया झंड सध्या मालाड परिसरातील ४ बीएचके फ्लॅटमध्ये राहते. लहानपणापासून प्राणीप्रेमामुळे तिने मांसाहार नाकारला. कुटुंबीय मांसाहारी असताना, “मी त्यांच्यावर प्रेम करते, त्यामुळे त्यांना खाऊ शकत नाही,” म्हणत घरातच बंड पुकारले. वयाच्या बाराव्या वर्षी एक मित्र त्याच्या श्वानाला मारताना पाहून तिला धक्का बसला. तिने त्याच्या तावडीतून श्वानाची सुटका करत तो श्वान घरी आणला. मात्र वडिलांनी विरोध केल्यामुळे तिने त्या श्वानासाठी घर सोडले आणि मावशीकडे जाऊन राहू लागली.

दिवसेंदिवस डॉ. रायाचे प्राणीप्रेम घरच्यांना जड जाऊ लागले तर दुसरीकडे इराणमध्ये होत असलेल्या प्राण्यांच्या हत्यांमुळे तिला तेथे राहणे अशक्य वाटू लागल्याने तिने पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत राहण्यास असलेल्या आईकडे जात असल्याचे सांगत घर सोडून भारत गाठले. मुंबईतल्या मालाड भागात ती राहते.  नुकतेच, गोरेगाव रेल्वेस्थानकात  एका श्वानाकडे पाल ग्रुपच्या झंकार शहा यांचे लक्ष गेले. रेल्वेखाली चिरडण्यापूर्वी त्यांनी या श्वानाला ताब्यात घेत त्याचे प्राण वाचवले. या श्वानाला अशा अवस्थेत सोडल्यास पुन्हा कुठेतरी अपघातात त्याचा मृत्यू होऊ शकतो, या भीतीने त्याला कोणीतरी दत्तक घेण्याचे आवाहन त्यांनी केले. याच ग्रुपमध्ये असलेल्या डॉ. राया यांनी त्या श्वानाला आधार देत दत्तक घेतले. अशाच प्रकारे तिने तब्बल १४ श्वान दत्तक घेतले आहेत.  

लसीकरण सुरूज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत, अशा भागातील श्वानांना कुठला आजार होऊ नये म्हणून रेबीज लस देण्याची मोहीम तिने सुरू केली आहे. सध्या दिवसभर ती मुंबईतल्या गल्लीबोळात, कोरोनाची भीती न ठेवता जीव धोक्यात घालून ती फक्त या मुक्या जीवांसाठी धडपडताना दिसत आहे.

बेडरूम मुक्या जीवांसाठीया श्वानांसह ती दिवाळी, गणपतीचा सणही साजरा करत आहे. या श्वानांसाठी घरातील बेडरूम तिने रंगीत दिव्यांनी सजवला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या