शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
3
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
7
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
8
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
9
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
10
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
11
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
12
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
13
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
14
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
15
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
18
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
19
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
20
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश

मृत्यूनंतर ११ वर्षाच्या मुलीला एका डायरीनं केलं फेमस; 'त्या' ८ वर्षात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 11:22 IST

जर्मनीच्या सैनिकांनी १० मे १९४० रोजी नेदरलँडवर पूर्णपणे कब्जा मिळवला होता. तिथेही ज्यूविरोधी कायदा लागू झाला.

११ वर्षाच्या मुलीनं डायरी लिहिणं सुरू केले तेव्हा तिला स्वप्नातही वाटलं नसेल की पुढे जाऊन तिची डायरी जगात प्रसिद्ध पुस्तक बनेल. या मुलीचं नाव एनेलिस मैरी फ्रँक(Annelies Marie Frank) तिला लोक ऐन फ्रॅक नावानेही ओळखतात. ऐनचा जन्म १२ जून १९२९ साली जर्मनीच्या फ्रँकफर्ट येथील यहूदी कुटुंबात झाला. आई वडील, बहिणीसह ऐन याठिकाणी राहत होती. सर्वकाही ठीक सुरू होतं पण १९३३ मध्ये देशात हिटलरचं नाजी सरकार आले अन् परिस्थिती अचानक बदलली. 

फ्रँकफर्टचा महापौर नाजी पार्टीचा होता जो ज्यूविरोधक होते. ऐनचे वडील ऑटो फ्रँक(Otto Frank) यांना कळालं होतं की, आता जर्मनीत राहणं धोक्याचं आहे. त्यासाठी लवकरच ते कुटुंबासह जर्मनीतून नेदरलँड येथे स्थलांतरित झाले. ते कुटुंबासह राजधानी एम्स्टर्डम येथे राहायला लागले. त्यावेळी ऐन फक्त ४ वर्षाची होती. काही काळाने दोन्ही बहिणी शाळेत जायला लागल्या. ओटो फ्रँक यांना नोकरी मिळाली. याठिकाणी ते कुटुंबासह भाड्याच्या खोलीत राहत होते. काही वर्ष निघून गेली. 

त्यानंतर १ सप्टेंबर १९३९ चा दिवस उजाडला. जगात दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. फ्रँक कुटुंबाला नेदरलँडमध्येही राहणं धोक्याचं झाले. त्याठिकाणाहून ते ब्रिटनला शिफ्ट होणार होते परंतु हातातून वेळ निघून गेला होता. जर्मनीच्या सैनिकांनी १० मे १९४० रोजी नेदरलँडवर पूर्णपणे कब्जा मिळवला होता. तिथेही ज्यूविरोधी कायदा लागू झाला. दहशतीखाली फ्रँक कुटुंब जीवन जगत होतं. आता ऐन ११ वर्षाची झाली होती. आई वडिलांनी तिला बर्थडे गिफ्ट म्हणून एक डायरी भेट दिली. त्यात ती प्रत्येक दिवशी घडणाऱ्या घटना लिहू लागली. 

त्याकाळी ज्यू समाजाची परिस्थिती अ‍ॅमस्टरडॅममध्ये अत्यंत बिकट झाली होती. सुरुवातीला दोन्ही बहिणींची शाळा सुटली. ऐनची बहिण मार्गोटला जर्मनी लेबर कँम्पला पाठवलं. आई वडील घाबरलेले होते. पण जाणार तरी कुठे? त्यादिवशी ऐननं तिच्या डायरीत लिहिलं की, लपायचं आहे, कुठे लपणार? गावात की शहरात? कोणत्या घरी किंवा झोपडीत? हा प्रश्न आहे पण विचारायची परवानगी नाही. परंतु मनात विचार सुरु आहेत. 

६ जुलै १९४२ चा दिवस, कुटुंबाला अखेर लपण्यासाठी एक जागा सापडली. ज्याठिकाणी फ्रँक काम करत होते तिथे छोटाशा फ्लॅट तयार केला गेला. कुटुंब तिथे शिफ्ट झाले. कुणालाही दिसू नये यासाठी दरवाजाबाहेर बुक रॅक बनवलं होतं. या कंपनीत काम करणाऱ्यांनी फ्रँक कुटुंबाची मदत केली. खाण्यापिण्याच्या गरजेचे वस्तू फ्रँक कुटुंबाला देत होते. त्याचसोबत बाहेरच्या परिस्थितीची कुटुंबाला माहिती देत राहिले. 

८ वर्ष २ कुटुंब सोबत राहिलेयाचठिकाणी आणखी एक कुटुंब राहायला होते. एकूण ८ वर्ष दोन्ही कुटुंब लपून याठिकाणी वास्तव्य करत होते. तिथे दिवसभर शांततेत राहावं लागायचं जेणेकरून कुणालाही याठिकाणी कुटुंब राहत असल्याची भनक लागू नये. दोन्ही कुटुंब ज्या टॉयलेटचा वापर करत होते त्याठिकाणी पूर्ण दिवस फ्लश करू शकत नव्हते. रात्रीच्यावेळी तिथे टॉयलेट साफ केलं जात होते. 

वेळ घालवण्यासाठी ऐन डायरी लिहित राहिलीऐनने तिच्या डायरीत या फ्लॅटचे नाव 'सिक्रेट अनेक्स' म्हणजेच गुप्त कोठडी असं लिहिलं होतं, कारण येथे आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी होत्या. मुक्तपणे जगण्याचे स्वातंत्र्य नव्हते. त्यांना न बोलता संपूर्ण दिवस तिथेच काढावा लागला. टाईमपास करण्यासाठी ती डायरी लिहीत राहिली. कितीतरी वेळा स्वतः अनेक गोष्टी लिहून ती खोडून टाकायची. मग पुन्हा त्याच्या जागी दुसरं लिहायची. एकदा जेव्हा तिचं आईशी भांडण झालं तेव्हा ऐनने लिहिलं होतं, "ती मला आईसारखी वागवत नाही. " नंतर जेव्हा तिला पश्चात्ताप झाला तेव्हा तिने लिहिलं, "ऐन, तू अशा घृणास्पद गोष्टी कशा लिहू शकतेस?"

ऐनच्या या डायरीमध्ये केवळ तिच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेखच नव्हता तर त्या काळात ज्यू लोकांवर झालेल्या अत्याचारांचीही बरीच माहिती या डायरीच्या माध्यमातून मिळाली आहे. ऐनने डायरीत जे लिहिले त्यावरून, त्या वेळी ज्यूंच्या मनात काय वाटत असेल हे आपण अनुभवू शकतो. ऐनने एका ठिकाणी असेही लिहिले आहे की जे घडले ते बदलता येत नाही, परंतु ते थांबवले जाऊ शकते. त्यानंतर ४ ऑगस्ट १९४४ रोजी जर्मन पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकून ८ लोकांना पकडले. खरं तर, कोणीतरी त्यांच्या इथल्या मुक्कामाची माहिती मिळवली आणि नाझींना याबद्दल माहिती दिली. एक महिन्यानंतर, या ८ लोकांना ट्रेनमधील इतर ज्यूंसोबत छावणीत पाठवण्यात आले, या ट्रेनमध्ये १००० हून अधिक ज्यू होते. येथे स्त्री-पुरुष स्वतंत्रपणे आणले जात होते. ऐन आणि तिची बहीण आईसोबत राहिली. तर वडिलांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आले. ऐननं या काळात घडलेल्या घडामोडी डायरीत लिहिल्या. ऐनच्या मृत्यूनंतर तिची ही डायरी आता जगासमोर पुस्तक रुपात समोर आलं आहे.