शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हौसेला मोल नाही! 11 वर्षीय मुलाने खरेदी केली जमीन; हटके कारण वाचून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 15:12 IST

हौसेखातर तर कधी कमाल करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे.

लहान मुलांचे काही छंद, आवडीनिवडी या अगदी वेगळ्या असतात. मुलंदेखील त्यासाठी काहीही करतात. हौसेखातर तर कधी कमाल करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. आयरलँडमध्ये राहणाऱ्या 11 वर्षांच्या एका मुलाने आपल्या एका हौसेखातर स्कॉटलंडमध्ये 5 चौरस फूट जमीन विकत घेतली आहे. अर्नोल्डर (Arnaldur Kjárr Arnþórsson) असं या मुलाचं नाव आहे. त्याने ही जमीन का विकत घेतली, यामागचं कारण समजल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

आयरलँडमधल्या रेकजाविक (Reykjavík) मध्ये राहणाऱ्या अर्नोल्डरने स्कॉटलंडमध्ये 5 चौरस फूट जमीन खरेदी केली आहे. कारण त्याच्या नावापुढे 'लॉर्ड' ही पदवी हवी होती. लोकांनी आपल्याला लॉर्ड अर्नोल्डर (Lord Arnaldur) म्हणून ओळखावं, आपलं नाव लॉर्ड अर्नोल्डर असं घेतलं जावं, अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे त्याने ही जमीन खरेदीचा केल्याचं म्हटलं आहे. सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

अर्नोल्डरने स्कॉटलंडमध्ये3 हजार रुपयांना 5 चौरस फूट जमीन विकत घेतली आहे. त्याच्या देशात जमिनीच्या या एवढ्याशा तुकड्याला विशेष महत्त्व नसेल पण स्कॉटलंडमध्ये या जमिनीचा मालक असल्यानं सर्व जण त्याला 'लॉर्ड अर्नोल्डर' नावाने हाक मारतील. त्यामुळे ही जमीन खरेदी केल्याचं त्याने म्हटलं आहे. स्कॉटलंडमध्‍ये जमीन विकत घेतल्‍यानंतर स्वत:ला लॉर्ड्स म्हणवणार्‍या 'रॅग डॉल्‍स' याचा व्हिडिओ पाहिल्‍यानंतर आपल्याला ही जमीन विकत घेण्याची कल्पना सुचली, असं त्यानं सांगितलं. मुलाने व्हिडिओ बघून गुगलवर (Google) याबाबत सर्च केलं. 

'व्हॅलेंटाइन डे'ची ऑफर म्हणून त्याला जमिनीच्या किमतीत 80 टक्के सूट मिळाली. हा फायद्याचा व्यवहार पाहून त्याने ही जमीन विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे वडील अर्नपोर यांना त्याबद्दल माहिती दिली. त्यांनीही या व्यवहाराला होकार दिला. त्यानंतर अर्नोल्डरनं वडिलांनी दिलेल्या पैशातून ही जमीन खरेदी केली. अर्नोल्डरनं आपल्याला लॉर्ड अशी हाक मारली जावी म्हणून स्कॉटलंडमध्ये जमीन खरेदी केली आहेच; पण त्याला तिथं जाऊन राहायचं देखील आहे. मात्र केवळ यामुळे आता अर्नोल्डरला लॉर्ड म्हटलं जाईल असं त्याच्या आईला वाटत नाही. तसंच त्याचे मित्रही अजून त्याला 'लॉर्ड अर्नोल्डर' अशी हाक मारत नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके