शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ग्रँड मास्टर! 10 महिन्यांच्या मुलाने रचला इतिहास; 8 वर्ल्ड रिकॉर्ड मोडून झाला 'द डॉक्यूमेंट बॉय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 16:32 IST

10 महिन्यांच्या मुलाचं नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील समाविष्ट करण्यात आले आहे. लोक त्याला आता 'द डॉक्युमेंट बॉय' म्हणून ओळखू लागले आहेत. 

ग्रेटर नोएडामधील एका सोसायटीत राहणारा अवघ्या 10 महिन्यांचा रिवांश मिश्रा एकापाठोपाठ एक असे तब्बल आठ वर्ल्ड रेकॉर्ड मोडून ग्रँड मास्टर ठरला आहे. रेवांशची सर्व सरकारी कागदपत्रं लहान वयातच तयार झाली आहेत. त्याने वर्ल्ड रेकॉर्ड मोडून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. या 10 महिन्यांच्या मुलाचं नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील समाविष्ट करण्यात आले आहे. लोक त्याला आता 'द डॉक्युमेंट बॉय' म्हणून ओळखू लागले आहेत. 

10 महिन्यांच्या रिवांशकडे सर्व कागदपत्रं आहेत जी अनेक ज्येष्ठ नागरिकांकडेही नाहीत. ग्रेटर नोएडा येथील गॉड सिटी येथे मयंक मोहित मिश्रा आपल्या कुटुंबासह राहतात. ते जलसंधारणाच्या क्षेत्रात काम करतात. मयंक यांना 10 महिन्यांचा मुलगा असून त्याचं नाव रिवांश आहे. रेवंशाच्या 10 महिन्यांची सर्व सरकारी कागदपत्रं तयार झाली आहेत. रिवांशचे जन्माचा दाखला आणि आधार कार्ड अवघ्या तीन दिवसांत बनवण्यात आले. 

रिवांशचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. अवघ्या 2 महिन्यांच्या वयात त्याची सर्व कागदपत्रं तयार केल्यानंतर आता वयाच्या 10 महिन्यांत त्याच्या नावावर अनेक जागतिक विक्रम नोंदवले गेले आहेत. रिवांशच्या वडिलांनी सांगितलं की, अलीकडेच त्यांचा मुलगा रिवांशच्या रेकॉर्डचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील मूल्यांकन करण्यात आले आहे. रिवांशचा जन्म 15 जानेवारी 2023 रोजी झाला होता. 

रेवांशच्या जन्माचा दाखल, आधार कार्ड, गव्हर्नमेंट व्हॅक्सीनेशन कार्ड, पॅन कार्ड, ABHA कार्ड, बँक अकाऊंट, पीपीएफ अकाऊंट, किसान विकास पत्र, एलआयसी, आरडी, एफडी, डेबिट कार्ड आणि चेकबुक, मूळ रहिवासी प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिस अकाऊंट काढण्यात आलं आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने या मुलाच्या विक्रमाला ग्रँड मास्टर असं म्हटलं आहे. आता सर्वजण रिवांशला ‘द डॉक्युमेंट बॉय’ म्हणून ओळखू लागले आहेत. hindi.news18 ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके