शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटी पगार, केवळ ६-७ तास काम, तरीही या नोकरीसाठी अर्ज करण्यास कचरताहेत लोक, कारण काय? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 19:09 IST

Jab: केवळ लाईटचा बल्ब बदलण्यासाठी एक कोटी रुपये पगाराची नोकरी. वाचून थोडं आश्चर्य वाटलं असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर एक अशा नोकरीची जाहिरात ही चर्चेचा विषय ठरली आहे.

केवळ लाईटचा बल्ब बदलण्यासाठी एक कोटी रुपये पगाराची नोकरी. वाचून थोडं आश्चर्य वाटलं असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर एक अशा नोकरीची जाहिरात ही चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र एवढ्या लठ्ठ पगाराची ऑफर असूनही लोक या नोकरीसाठी अर्ज करण्यास कचरत आहेत. त्याचं कारण म्हणजे या कामामध्ये जोखीम भरपूर आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या जाहिरातीनुसार ही नोकरी टॉवरवरील विजेचे दिवे बदलण्याची आहे. अमेरिकेतील साऊथ डेकोटा येथे या नोकरीसाठी जागा निघाल्या आहेत. यामध्ये तुम्हाला ६०० मीटरहून अधिक उंचीच्या सिग्नल टॉवरवर चढून त्यावरील बल्ब बदलावे लागतील.हे टॉवर इतर सामान्य टॉवरपेक्षा थोडे वेगळे आहेत. तुम्ही त्यावर जेवढे उंचावर जाल तेवढे ते बारीक होत जातात. एवढ्या उंचावर पोहोचणं आणि तिथं उभं राहून बल्ब बदलणं हे आव्हानात्मक आहे. तसेच वर चढण्यासाठी सेफ्टी म्हणून केवळ सेफ्टी केबलचा वापर होतो. 

मिरर यूकेने दिलेल्या वृत्तानुसार या नोकरीमधील सर्वात आवश्यक असलेली अट म्हणजे नोकरीसाठी इच्छुक अर्जदाराला उंचीची भीती वाटता कामा नये. तो शारीरिक दृष्टा पूर्णपणे तंदुरुस्त असला पाहिजे. या नोकरीसाठी एक वर्षापेक्षा कमी अनुभव असलेले लोकही अर्ज करू शकतात. पगार हा अनुभवाच्या आधारावर निश्चित केला जाईल. मात्र सुरुवातीचा पगार हा सर्वसामान्य पगारापेक्षा खूप जास्त असेल.

जमिनीपासून ६०० मीटर उंच असलेल्या टॉवरवर चढण्यासाठी सुमारे तीन तास वेळ लागतो. तसेच वरून खाली उतरण्यासाठीही तेवढाच वेळ लागतो. म्हणजेच कामाची वेळ ६ ते ७ तास एवढी असेल. त्याशिवाय टॉवरच्या टॉपवर १०० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतात. त्यामुळे जो या टॉवरवर उभा राहून बल्ब बदण्याचं काम करेल, त्याच्यासमोर आव्हान आणखीच कठीण बनते.

जी व्यक्ती हे काम करेल, त्याला सुमारे १००००० पौंड्स (सुमारे १ कोटी रुपये) वार्षिक पॅकेज मिळेल. प्रत्येक सहा महिन्यांमध्ये एक ते दोन वेळाच कुठल्याही टॉवरवरील बल्ब बदलावा लागतो. मात्र हे काम एकट्यानेच टॉवरवर चढून करावे लागणार आहे.  

टॅग्स :jobनोकरीJara hatkeजरा हटकेUnited Statesअमेरिका