शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

जि़.प. त विज्ञान केंद्राच्या निविदेवरून सत्ताधारीच भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:04 IST

सभा तापली : माजी उपाध्यक्ष म्हणतात प्रक्रिया नव्याने राबवा, माजी सभापतींची निविदा कायम ठेवण्याची मागणी

जळगाव : गेल्या काही सभांमध्ये सातत्याने वादग्रस्त ठरत असलेल्या विज्ञान केंद्राच्या अडीच कोटी रूपयांच्या निविदेवरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेतही सत्ताधाऱ्यांमध्येच जोरदार खडाजंगी झाली़ ही प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत ती नव्याने राबवावी अशी मागणी माजी उपाध्यक्षांसह अनेक सदस्यांनी लावून धरली तर हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक विषय असल्याचे सांगत ती कायम ठेवावी, अशी मागणी माजी सभापती पोपट भोळे यांनी केली़ या गोंधळानंतर याबाबचा निर्णय स्थगित ठेवण्यात आल्याचे सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी सांगितले़जिल्हा परिषदेची सर्वसाधरण सभा अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत झाली़ उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण, आरोग्य सभापती रवींद्र पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, महिला व बालविकास सभापती ज्योती पाटील, कृषी व पशूसंवर्धन सभापती उज्ज्वला माळके, सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील, अतिरिक्त सीईओ विनोद गायकवाड, डेप्युटी सीईओ के़ बी़ रणदिवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते़विषयांआधी वादाला सुरूवातसभा सुरू होताच मानव विकासच्या निधीतून सात तालुक्यांमध्ये सुरू करण्यात येत असलेल्या विज्ञान केंद्रा बाबतच्या निविदांवरून गोंधळास सुरूवात झाली़ कोट्यवधींच्या कामाच्या निविदा या कुणालाही कल्पना न देता प्रसिद्ध होतात, असा मुद्दा मधुकर काटे यांनी मांडला यावर रावसाहेब पाटील, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनीही ही निविदा प्रक्रियाच बेकायदेशी असल्याचे सांगत त्यात इस्टीेमेटच जोडलेले नसल्याचा मुद्दा मांडला़ पोपट भोळे यांनी यात प्रत्यूत्तर देण्याचा प्रयत्न करीत असताना मोठा गोंधळ उडाला बराच वेळ हा गोंधळ सुरू होता़ निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी व काही विरोधी सदस्य आक्रमक भूमिका मांडत होते़ ही प्रक्रिया रद्दच करा, असा पवित्रा त्यांनी घेतला होता़ अखेर तपासणी करून हा निर्णय स्थगित ठेवण्याच्या सूचना सीईओंनी दिल्या़ दरम्यान, पाणीपट्टी वसुलीचा मुद्दाही गाजला जिल्हाभरात जानेवारी अखेरपर्यंत ५५ टक्के वसुली झाली असल्याचे अधिकारी बोटे यांनी सांगितले़ यावर ही कागदोपत्री वसुली असून मार्च पर्यंत बरोबर ८० टक्क्यांपर्यंत जाईल, असा टोला सदस्यांनी लगावला़ दरमहिन्याला वसुलीचा आढावा घेऊन एकूण वसुलीपैकी २० टक्के जिल्हा परिषदेत दरमहिन्याला जमा करावी, असे नियोजन करण्याच्या सूचना सीईओ डॉ़ पाटील यांनी दिली़६९ कोटींची कामे कोणासामेर आली? - भोळेआपण सभापती असताना िविज्ञान केंद्राबाबत विषय झाला़ सर्व प्रक्रिया नियमानुसारच झाल्याचे स्पष्टीकरण पोपट भोळे यांनी दिले़ या विषयाला विरोध होतो, तर किती कामे सभेसमोर येतात़ ६९ कोटींची कामे सुरू असताना ती कोणत्या सभेसमोर आली़ असा सवाल त्यांनी उपस्थित केला़ यावर तुम्ही तक्रार करा असा सल्ला नंदकिशोर महाजन यांनी दिला़ या मुद्दयावूरन भोळे विरूद्ध सत्ताधारी असे चित्र निर्माण होते़ प्रभाकर सोनवणे, यांनीही आक्षेप नोंदविला़विरोधकांचे विषय दाबले जातातरिंगणगाव आरोग्य केंद्राच्या निर्लेखनाच्या विषयावरून सदस्य नानाभाऊ महाजन यांनी मांडला़ अध्यक्षांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला या अधिकाऱ्यांच्या उत्तरावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली़ विकास कामांना विरोध होत असेल तर हे गंभीर असल्याचे ते म्हणाले़ विरोधकांचे विषय मुद्दामहून दाबून ठेवले जातात, असा आरोप त्यांनी केला़वाद अन् सदस्यांची मध्यस्थीसदस्य गोपाल चौधरी व नंदकिशोर महाजन यांच्यातही जोरदार खडाजंगी झाली़ वसुली होत नसल्याने याला सदस्यही जबाबदार असल्याचा मुद्दा चौधरी यांनी मांडला़ यावर महाजन यांनी आक्षेप नोंदविला़ ‘आता तुम्ही खाली आहात, विषय मध्येच थांबविणे चालणार नाही, असे सांगत चौधरींनी महाजन यांना थांबविण्याचा प्रयत्न केला़ यानंतर जोरदार वाद झाले व अन्य सदस्यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव