शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांना तीसहून कमी पटसंख्येसाठी अवघे पाच हजार रूपये अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 21:31 IST

खर्च भागणार कसा? : जिल्ह्यातील १८६५ शाळांना ५ कोटी ५३ लाख ५५ हजार रूपयांचे अनुदान

जळगाव- केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान यांचे एकत्रीकरण करून अस्तित्वात आणलेल्या समग्र शिक्षण अभियानांतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील अनुदानाचे वितरण पटसंख्येनुसार करण्यात आले आहे. यात तीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील तब्बल ३४६ शाळांना अवघे पाच हजार रुपये अनुदान मंजूर करून वितरित केले गेले आहे़ मात्र, वर्षभरासाठी मिळालेल्या पाच हजार रूपयांच्या अनुदानामध्ये वीजबील, शैक्षणिक साहित्य व इमारतीचा खर्च यासाठी लागणारा खर्च भागवायचा कसा असा प्रश्न संबधित शाळांसमोर निर्माण झाला आहे.समग्र शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या रक्कमेत शाळांनी विद्युत उपकरणांची दुरुस्ती, इमारतींची किरकोळ दुरुस्ती, मैदानाची देखभाल, वीज देयके भरणे, स्वच्छतागृहांची देखभाल, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, उपक्रम राबवणे, विविध अभियाने राबवणे, परसबाग करणे अपेक्षित आहे. मिळणाºया अनुदानातील दहा टक्के रक्कम ही स्वच्छ भारत अभियानासाठी खर्च करणेही बंधनकारक असल्याने केवळ पाच हजार रुपयांमध्ये हे सर्व खर्च कसे भागविणार असा प्रश्न ३० हून कमी पटसंख्या असलेल्या शाळांना पडला आहे. यापूर्वी राज्यातील गतसरकारने कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला विरोध झाल्यानंतर आता या शाळांच्या अनुदानातच कपात करण्याचा घाट घातला गेला असून तीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना २०१९-१० या शैक्षणिक वर्षासाठी अवघे पाच हजार रुपये वार्षिक अनुदान देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.१८६५ शाळांना ५ कोटी ५३ लाख ५५ हजारांचे अनुदानजळगाव जिल्ह्यातील १८६५ शाळांना ५ कोटी ५३ लाख ५५ हजारांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते़ शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियान विभागाकडून हे अनुदान सप्टेंबर महिन्यात शाळांना वितरित करण्यात आले आहे़ दरम्यान, पटसंख्येनुसार अनुदान वितरित केले गेले आहे़असे आहे पटसंख्येनुसार अनुदानशासनाकडून पटसंख्येनुसार पाच टप्प्यांमध्ये अनुदानाची वर्गवारी करण्यात आली आहे़ त्यामध्ये ०१ ते ३० पटसंख्या असलेल्या शाळांना ५ हजारांचे अनुदान, तर ३१ ते ६० पटसंख्या असलेल्या शाळांना १० हजार रूपयांचे अनुदान, ६१ ते १०० पटसंख्या शाळांना २५ हजार रूपये, १०१ ते २५० पटसंख्या असलेल्या शाळांना ५० हजार रूपये, तसेच २५१ ते १००० पटसंख्या असलेल्या शाळांना ७५ हजार रूपयांचे अनुदान शासनाकडून देण्यात येत असते़पटसंख्या शाळा वितरित अनुदान०१ ते ३० २५१ १४ लाख ४५ हजार३१ ते ६० ३४६ ४१ लाख १० हजार६१ ते १०० ४३० १ कोटी ७ लाख ५० हजार१०१ ते २५० ६४३ ३ कोटी २१ लाख ५० हजार२५१ ते १००० ९२ ६९ लाखतालुकानिहाय अनुदानाचे वाटपअमळनेर - ३४ लाख ५५ हजारभडगाव - २७ लाख २५ हजारभुसावळ - २० लाख ५० हजारबोदवड - १४ लाख ७० हजारचाळीसगाव - ६८ लाख २५ हजारचोपडा- ४५ लाख ५५ हजारधरणगाव - २४ लाख ८५ हजारएरंडोल- २७ लाख ७० हजारजळगाव- ३४ लाख ६५ हजारजामनेर- ६३ लाख ९५ हजारमुक्ताईनगर - ३० लाख ८० हजारपाचोरा - ४१ लाख २५ हजारपारोळा- ३६ लाख ९५ हजाररावेर - ४७ हजार ६० हजारयावल - ३५ लाख

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव