चोपडा, जि.जळगाव : जि.प.सदस्या प्रा.डॉ.नीलम पाटील यांनी स्वयंप्रेरणेतून स्वच्छता अभियानास चहार्डी येथून २ रोजी सुरुवात केली. ओल्या व सुक्या कचऱ्यापेक्षा प्लॅस्टिकचे प्रमाण संकलनात खूप जास्त होते. अतिशय घातक पर्यावरणाच्या दृष्टीने लवकरच प्लॅस्टिक मुक्ती पर्यावरणातून करण्याचा आत्मविश्वास मनाशी बाळगून कामाला सुरुवात केली.दोन तास केलेल्या स्वच्छता अभियानात कालिका माता मंदिर परिसरापासून शिवाजी सोसायटी, प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत स्वच्छता करण्यात आली. एक ट्रॉलीभर कचरा संकलन केले.या कार्यात सरपंच प्रमिला सोनवणे, प्रकाश सोनवणे, दीपक पाटील, सुनील पाटील, रवींद्र भोई, सचिन पाटील, प्रशांत शिंदे, प्रदीप पाटील, प्रा.डॉ.हंसराज पाटील, शशिकांत पाटील, दिनकर पाटील, बापू पाटील, दिलीप पाटील, सुनील पाटील, नितीन पाटील व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
जिल्हा परिषद सदस्यांनी स्वच्छता अभियानास स्वत:पासून केली सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 18:07 IST
जि.प.सदस्या प्रा.डॉ.नीलम पाटील यांनी स्वयंप्रेरणेतून स्वच्छता अभियानास चहार्डी येथून २ रोजी सुरुवात केली.
जिल्हा परिषद सदस्यांनी स्वच्छता अभियानास स्वत:पासून केली सुरुवात
ठळक मुद्देओल्या व सुक्या कचऱ्यापेक्षा प्लॅस्टिकचे प्रमाण संकलनात खूप जास्तअतिशय घातक पर्यावरणाच्या दृष्टीने लवकरच प्लॅस्टिक मुक्ती पर्यावरणातून करण्याचा आत्मविश्वास