शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत अंधळा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 21:35 IST

पदाधिकारी आणि अधिकाºयांमध्ये समन्वय नाही

ठळक मुद्देसदस्यांनी कोणाकडे पहावे?
हितेंद्र काळुंखेजळगाव: गेल्या दिड वर्षात जिल्हा परिषदेत पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात समन्वय राहिलेला नाही. यामुळे विविध कामे वेळेवर होत नसल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर एकूण कारभार हा अंधळेपणाने चालल्याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे.या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत आता चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे, असेच म्हणावे लागणार आहे. भूसंपादन प्रकरणात जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास निधीची अडीच कोटी इतकी रक्कम न्यायालयाच्या आदेशाने संबंधित शेतकºयांना देण्यासाठी थेट वर्ग करण्यात आली. मात्र याची जिल्हा परिषदेच्या कोणत्याही पदाधिकाºयांना खबरही नसल्याचा प्रकार शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आला. विरोधकांनी हा मुद्दा मांडला. मात्र पदाधिकारी आणि अधिकारीही अनभिज्ञ होते. याबाबत मात्र कोणतीही प्रतिक्रिया पदाधिकाºयांकडून उमटली नाही किंवा त्याचा पाठपुरावा झाला नाही. दुसरी बाब अशी की, जिल्हा परिषदेचे स्वमालकीचे २० गाळे असून थकबाकी वसुुलीसाठी जि.प. कडून हे गाळे ताब्यात घेतले जाणार होते मात्र १८ जण न्यायालयात गेल्याने ही कारवाई करता आली नाही. परंतु दोघे जण न्यायालयात न गेल्याने ते दोन गाळे ताब्यात घेता आले असते परंतु अधिकाºयांमध्ये उदासिनता असल्याने ही कार्यवाही झाली नाही. मुळातच थकबाकी वसुलीची कार्यवाही ही खूपच उशिरा सुरु करण्यात आली. अधिकारी भान ठेवूृन काम करीत नाही आणि पदाधिकारी पूर्ण लक्ष घालत नाही, अशी अवस्था असून जि. प. चा कारभार केव्हा सुधरणार हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. यावर कडी म्हणजे अधिकाºयांनी पदाधिकाºयांना नियंत्रणात ठेवण्याचे काम करायला हवे असे असताना पदाधिकाºयांकडूनच अनेकदा अधिकारी ऐकत नाही, अशा तक्रारी होतात. यामुळे इतर सदस्यांनी कोणाकडे पहावे? असा सवालही व्यक्त होवू लागला आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पदाधिकाºयांनीच विविध कामाच्या फाईल्सची आवक - जावक रजिस्टर मध्ये नोंद न होता या फाईल्सचा अंधाधुंद प्रवास होत असल्याच मुद्दा मांडून जि.प. तील अंधळा कारभार स्वत:च उघड केला आहे. यावर सूचना नियमानुसार फाईल्सचा प्रवास व्हावा,अशी सूचना केली आहे. परंतु आतापर्यंत पदाधिकाºयांच्या अनेक सूचना हवेतच विरल्याची अनेक प्रकार आहेत. यामुळे आता या सूचनेचे पालन होते की नाही याबाबतही शंका निर्माण होते. अशा या गंभीर स्थितीवर कठोर इलाज होणे गरजेचे आहे.
टॅग्स :Jalgaonजळगावzpजिल्हा परिषद