शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

चपला घालून आंदोलन प्रकरणी युवासेनेचे गोमूत्र दुग्धाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 16:38 IST

मंदिरे पूर्ववत सुरू करा यासाठी भाजप नेत्यांनी शनिवारी चपला घालून केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ युवासेनेने रविवारी मुक्ताई मंदिरात अभिषेक करून परिसर स्वच्छ केला

ठळक मुद्देआरोप करणाऱ्यांनी संत मुक्ताईचे दर्शन घ्यावे : खासदार रक्षा खडसे यांचा युवा सेनेला प्रतिटोलायुवासेनेने रविवारी मुक्ताई मंदिरात अभिषेक करून परिसर स्वच्छ केला

मुक्ताईनगर : मंदिरे पूर्ववत सुरू करा यासाठी भाजप नेत्यांनी शनिवारी चपला घालून केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ युवासेनेने रविवारी मुक्ताई मंदिरात अभिषेक करून परिसर स्वच्छ केला तर आरोप करणाऱ्यांनी किमान मुक्ताईचे दर्शन तरी घ्यावे; तेव्हा वस्तुस्थितीची जाणीव होईल, असा प्रतिटोला खासदार रक्षा खडसे यांनी युवा सेनेला लगावला आहे.मंदिराचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी युवासेनेतर्फे पुरोहितांच्या मंत्रोच्चारात चक्क गोमूत्र व दुग्धाभिषेकाने मंदिराचा गाभारा पवित्र करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, तालुका प्रमुख पंकज राणे, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर संघटक वसंत भलभले, शहरप्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, गणेश पाटील, प्रकाश गोसावी, चेतन पाटील, दीपक कोळी, रवी दांडगे, शुभम शर्मा, प्रमोद पाटील पुरणाड, राजू तळेले, नामदेव भिल्ल, पप्पू मराठे, आकाश भोई, शुभम तळेले, अमोल भोई, तानाजी पाटील, कृष्णा पाटील, सुनील पाटील तरोडा आदींसह शिवसेना, युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात संत मुक्ताई मंदिर व आजूबाजूच्या परिसराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणलेला असून त्या निधीतून मुक्ताई मंदिराचा जीर्णोद्धार व अनेक विकासकामे सुरू आहेत. भाजपतर्फे ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले ते ठिकाण हे मंदिराच्या बाजूला नियोजित दुकानाची जागा असून त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. म्हणूनच आरोप करणाºयांनी स्वत: कोथळी येथील संत मुक्ताईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा आणि स्वत: खात्री करून घ्यावी, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी केले आहे.आरोप करणाºयांनी आमच्या पायातील चपला, बूट न पाहता राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने जागतिक कोरोना संकट काळात दारूची दुकाने उघडी केलीत, बाजारपेठा उघड्या केल्या, बाजारात प्रचंड गर्दी पहावी आणि भक्तांच्या भावना समजून घेऊन राज्यातील देवस्थाने, मंदिरे सुरू करण्यासाठी कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या सरकारला झोपेतून जागे करावे, असे आवाहन खासदारांनी केले आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनMuktainagarमुक्ताईनगर