शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

‘युवारंग’मध्ये मनोरंजनातून सामाजिक जाणिवांवर प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:34 IST

उत्साह, जल्लोष आणि भारलेल्या वातावरणात नुकताच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा युवारंग महोत्सव नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पार पडला़ पाच दिवस तरुणाईचे होते़ हे पाचही दिवस अक्षरश: तरुणाईने गाजविले़ यात कलाकारांना डोक्यावर घेतले होते़ त्यात कुळी कन्या, पुत्र होतीजे सात्त्विक या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे इथेही मान-सन्मान मिळविला तो मुलींनाचं़ केवळ धांगडधिंगा केंद्रस्थानी न ठेवता या पाच दिवसात विद्यार्थ्यांमधील कलाकारांनी सामाजिक जागृती व ज्वलंत विषयांवर आपल्या विविध कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकला़ त्यामुळे अन्य युवारंगांपेक्षा हे या युवारंगाचे एक वेगळे वैशिष्ट्य ठरले़

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचा ‘युवारंग’ महोत्सव आयोजित केला जातो़ मागील दोन वर्ष हा महोत्सव जिल्हास्तरावर झाला़ पुन्हा हा महोत्सव पाच दिवसांचा व्हावा ही विद्यार्थ्यांची मागणी जोर धरू लागल्यानंतर विद्यापीठाने विद्यार्थी केंद्र बिंदू मानून पुन्हा अविस्मरणीय ठरणारा खान्देशस्तरावर घेतला़ आणि तो उत्साहात व कुठेली विघ्न न येता पारही पडला़ अनेकांना खटकलेली कुलगुरूंची अनुपस्थिती वगळता, बाकी सर्व सुरळीत झाले, तर दुसरीकडे संगीत, नृत्य, साहित्यकला, नाट्यकला व ललितकला या पाच कला प्रकारात कलाकार विद्यार्थ्यांनी त्यांचे कलागुण उत्कृष्ट पद्धतीने मांडले़ विद्यार्थ्यांनी पारंपरिकतेवर भर देत संस्कृती जपली व तिचे त्याच तन्मयतेने तसेच अत्यंत उत्कृष्टतेने सादरीकरणही केले़ या सादरीकरणाने सर्वांचे मनही जिंकले़समाजातील चर्चेत असलेले ज्वलंत विषय विद्यार्थ्यांनी विविध कलांच्या माध्यमातून अत्यंत सहजतेने प्रेक्षकांच्या समोर मांडले़ यात महिला सुरक्षा, मोबाईलचा अतिरेकी वापर, नागरिकत्व कायदा, हुंडा बळी, स्त्रीभू्रण हत्या या विषयांना वाचा फोडली़ प्रेक्षकांनीही दाद देऊन या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले़ हैद्राबादमधील अत्याचार प्रकरण मूकनाट्यातून मांडून विद्यार्थ्यांनी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले होते़ केवळ मांडणीचं नव्हे तर विद्यार्थ्यांचा अभिनयही प्रत्येक कलाप्रकारात लक्ष वेधून घेत होता़ हे युवारंगाचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल़ खान्देशातील सुप्त कलागुणांना या युवारंगातून खरंच न्याय व वाव मिळाल्याचा प्रत्यय प्रत्येक प्रेक्षकाला यावेळी आला़ विशेष म्हणजे नेहमीच महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातील जे प्रचलित कलाप्रकारही विद्यार्थ्यांनी सादर केले़ त्यामुळे देशातील पारंपरिक संस्कृती प्रेक्षकांपर्यंत सुलभतेने पोहोचली़जेवणाने केला ‘मूड आॅफ’अत्यंत उत्साहात असलेल्या विद्यार्थ्यांचा जेवणात असलेल्या त्याच-त्याच मेनूमुळे ‘मूड आॅफ’ झाल्याचेही जाणवले़ अन्य व्यवस्था उत्तम होती़ पाच रंगमंचांवर एकावेळी विविध कलाप्रकार सादर केले जात होते़ प्रेक्षक प्रत्येक कलाप्रकार बघण्यासाठी सारखीच गर्दी उसळली होती़ विद्यार्थ्यांचे स्रेहसंमेलन म्हटले की, धांगड-धिंगा, धम्माल़, मस्ती, जल्लोष अन् असतो तो पोलीस बंदोबस्त़ आधीच विद्यापीठात काही दिवसांपूर्वी काही विद्यार्थी संघटनांनी केलेली आंदोलने या पार्श्वभूमीवर युवारंगावरही आंदोलनाचे सावट होते़ मात्र, संघटनांनीही या कला महोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही़ हे मात्र कौतुकास्पद म्हणता येईल़ अडीच हजार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था शहाद्यातील पूज्य साने गुरुजी मंडळ संचलित कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाकडून करण्यात आली़ अन् कुठलीही तक्रार ऐकायला मिळाली नाही़ हेसुद्धा उत्तम नियोजनाचे फलीत होते़़़.आणि डोळ्यांचे पारणे फेडलेमहोत्सवाच्या शेवटच्या दोन दिवसांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची पारणे तर फेडलीच पण प्रत्येक कलाप्रकाराचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला़ पारंपरिक नृत्य, शास्त्रीय नृत्यातून संपूर्ण ‘भारत’ रंगमंचांवर अवतरला होता, तर छायाचित्र स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचा चमत्कार दाखविला आणि मग शेवटचा उगवला अन् तो दिवस ठरला अविस्मरणीय. तो म्हणजे मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या अदांवर संपूर्ण तरुणाई फिदा झाली होती़ तिच्यासोबतचा क्षण टिपण्यासाठी एकाने तर चक्क रंगमंचावर धाव घेत सेल्फी घेतला़ परंतु, त्याच्या चुकीची त्याला क्षमादेखील मागावी लागली़ यामुळे जर आयुष्यात चूक केली तर त्यासाठी क्षमा मागितली तर आपल्याला कुणीही माफ करून देते हे यातून दाखवून देण्यात आले़ पारितोषिक वितरणाला ज्यांना बक्षीस मिळाले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होते तर ज्यांना मिळाले नाही, त्यांच्या मात्र चेहºयावर साफ निराशा दिसून आली़ मात्र, हा पराभव स्वीकारून खिलाडू वृत्तीने विद्यार्थी कलाकारांनी तेवढ्याच उत्साहात या पाच दिवसाच्या उत्सवाचा समारोप केला़-सागर दुबे, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव