चाळीसगाव, जि.जळगाव : उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून, दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. यात मानवाच्या राहणीमानाच्या बदलत्या संकल्पनेमुळे पक्ष्यांचीदेखील संख्या कमी होऊ लागली आहे. पक्ष्यांच्या जीवाची तगमग पाहता शहरातील युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळाच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जात आहे. यात ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून, पाण्यासाठी परळ प्रदान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, लता जाधव, वैष्णवी पाटील आदी उपस्थित होत्या.चिमणीसारखे अनेक पक्षी आज अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. अभयारण्यात पाण्याची मात्रा खालावल्याने अनेक पक्षी मानवी वस्त्यांकडे मार्गक्रमण करीत आहेत. त्यात शहरात बांधकाम वाढल्यामुळे पक्ष्यांना निवारा राहिलेला नाही. सावलीसाठी व पाण्यासाठी पर्यायी जागा शोधण्यासाठी वणवण करावी लागते. हे लक्षात घेत जागतिक चिमणी दिवसाच्या औचित्यपर मागील वर्षी शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयात घरटी वितरीत करण्यात आली होती. यास उत्तम प्रतिसाद लाभला होता. यात अनेकांनी आपापल्या परिसरात पक्ष्यांच्या निवाºयाची व्यवस्था केली होती.रणरणत्या उन्हात पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाणी न मिळाल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. यासाठी युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळाच्या वतीने जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे स्मिता बच्छाव यांनी सांगितले तर विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात येणार आहे. चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास असलेले काटेरी झुडपे, ओढे, वेली यासोबतच शाळा परिसरात असलेल्या झाडांवर परळ ठेवण्यात येणार असल्याचे सुचित्रा पाटील यांनी यावेळी सांगितले.
युगंधरा, हिरकणी भागवणार पक्ष्यांची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:30 IST
उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून, दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. यात मानवाच्या राहणीमानाच्या बदलत्या संकल्पनेमुळे पक्ष्यांचीदेखील संख्या कमी होऊ लागली आहे. पक्ष्यांच्या जीवाची तगमग पाहता शहरातील युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळाच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जात आहे.
युगंधरा, हिरकणी भागवणार पक्ष्यांची तहान
ठळक मुद्दे‘पक्ष्यांपर्यंत पाणी’ अभिनव उपक्रमचाळीसगावात सलग दुसऱ्या वर्षी उपक्रमजागतिक चिमणी दिनानिमित्त राबविणार अभियान