शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनो नोकरी मागणारे नव्हे देणारे व्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 17:57 IST

जळगावात सुरु असलेल्या अभाविपच्या अधिवेशना दरम्यान चर्चासत्रातील सूर

ठळक मुद्देउद्योजक होण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्या-पेशकारविद्यार्थ्यांनी संकल्पना समजून अभ्यास करावा-प्रा.साठेनोकरी मागणारा बनण्यापेक्षा नोकरी देणारा बनावे

आॅनलाईन लोकमतजळगाव , दि. २५ : युवकांनी रोजगाराची संधी मिळेल याची वाट बघत न बसता स्वत:मध्ये कौशल्य विकसित करून, शासकीय योजनांचा अभ्यासपूर्वक लाभ घेऊन स्वत:चा उद्योग सुरू करावा. नोकरी मागणारा बनण्यापेक्षा नोकरी देणारा बनावे, असा सूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या ५२ व्या प्रदेश अधिवेशनात सोमवार, २५ डिसेंबर रोजी सकाळी आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता.‘सुशिक्षत बेरोजगारी-समाजापुढील एक आव्हान आणि उपाय’ हा या चर्चासत्राचा विषय होता. त्यात राष्टÑीय सहसंघटनमंत्री जी.लक्ष्मण, माजी राष्टÑीय अध्यक्ष मिलिंद मराठे, आनंद कोठारी, प्रमुख अतिथी प्रदीप पेशकार, प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत साठे, प्रदेशमंत्री अभिजित पाटील, स्वागत समिती सदस्य गिरीश कुलकर्णी सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी संकल्पना समजून अभ्यास करावा-प्रा.साठेप्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत साठे म्हणाले की, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झाले की, रोजगाराची संधी मिळावी, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. मात्र रोजगार मिळणे ही काही जादूची कांडी नाही. ही एक प्रक्रिया, पद्धती असते. विद्यार्थ्यांना त्या-त्या विषयाबाबतच्या संकल्पना स्पष्ट करणारे शिक्षण मिळतेय की नाही? माहिती नाही. मात्र आपण ते शिक्षण घेत नाही हे निश्चित. संकल्पना समजून घेतली पाहिजे. तरच रोजगार मिळेल. परिषद त्यासाठीच कार्य करणार आहे. नोकरीसाठीची पात्रता वाढविण्याच्या शक्यतेत अभाविपचे काम १०० टक्के महत्वाचे ठरेल. सरकारवर टीका करून अथवा मागणी करून नोकरी मिळणार नाही. तर नोकरी मिळविण्यासाठी आपलीही क्षमता हवी, असे सांगितले.उद्योजक होण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्या-पेशकारप्रदीप पेशकार म्हणाले, नकारात्मकता बाजूला ठेवून सकारात्मक विचार करीत मी काय करू शकतो? हा या अधिवेशनातून घेऊन जाण्याचा मुद्दा आहे. जेवढे प्रयत्न सरकार, समाज करते, त्यापेक्षा दुप्पट प्रयत्न आपण स्वत: केले पाहिजे. सरकारी योजना आपल्यासाठी नाही, अशी भावना आपल्यात असते. त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे देखील आपल्याला माहित नसते. जर शासकीय योजनांची व्यवस्थित माहिती घेतली व आपल्याला काय करावयाचे आहे? आपल्यातील कोणते कौशल्य आहे? ते निश्चित करून व्यवसाय करावयाचे ठरविल्यास शासकीय योजनेतून त्यास निश्चितपणे मदत मिळू शकते. त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये शासकीय योजनांची माहिती देणारे अ‍ॅप डाऊनलोड करून घ्या, असे आवाहन केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव