शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी खुर्दला निकालानंतर गालबोट; दगडफेकीत तरुणाचा मृत्यू, गावकीच्या राजकारणात तरुणाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2022 17:40 IST

या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

- मोहन सारस्वत

जामनेर जि.जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने पराभूत गटाकड़ून देव दर्शनासाठी मंदिराकडे निघालेल्या विजयी उमेदवार व समर्थकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. यात एका  तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना टाकळी खुर्द (ता.जामनेर) येथे मंगळवारी दुपारी घडली.

या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. धनराज श्रीराम माळी (३२) असे हकनाक बळी गेलेल्या तरुणाचे नाव आहे. टाकळी खुर्द येथे भाजपच्याच दोन गटात लढत झाली. विजयी सरपंच व सदस्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे निवासस्थानी जाऊन नगराध्यक्ष साधना महाजन यांच्याकडून सत्कार स्वीकारला.

विजयी सरपंच व सदस्य जामनेर येथून टाकळी खुर्द येथे पोहचले. यानंतर  गावातील मंदिराकडे दर्शनासाठी जात असताना एका घरातून त्यांचेवर दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या या दगडफेकीने धावपळ सुरु झाली. धनराज श्रीराम माळी (३२) याला डोक्याला दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. उपचार सुरु असतानाचा त्याचा मृत्यू झाला.

धनराज याचे वडीलांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ समाधान व दोन बहिणी आहे. तो मोलमजुरी करीत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे सहकाऱ्यांसह टाकळीला पोहचले. घटनास्थळावरुन पोलिसांनी दगड व काही दुचाकी जप्त केल्या.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतJalgaonजळगाव