शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांना लुटणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 12:39 IST

अटक करायला गेलेल्या पोलिसाशी झटापट

जळगाव : मेहरुण तलावावर बिर्याणी पार्टी करायला आलेल्या पोलिसाच्या मुलासह तिघांना चाकूचा धाक दाखवून लुटणाºया दीपक भगवान माळी (२३, रा.जाकीर हुसेन कॉलनी, जळगाव) याच्या स्थानिक गुन्हे शाखच्या पथकाने बुधवारी सायंकाळी मुसक्या आवळल्या.दरम्यान, त्याच्याकडून तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. त्याचा साथीदार फरार आहे.प्रसाद भाऊसाहेब पाटील या पोलिसाच्या मुलाचा २३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त पल दिलीप लोटवाला (१९, रा. जयकिसनवाडी, जळगाव), आदित्य नारायण सूर्यवंशी व प्रसाद भाऊसाहेब पाटील असे तिघं मित्र २७ फेबुवारी रोजी रात्री पल मेहरुण तलावावर आले होते.रात्री साडे आठ वाजता मेहरुण तलावावर बिर्याणी पार्टी आटोपून घराकडे जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ‘इतक्या रात्री तुम्ही काय करतायेत’ म्हणून तिघांना धमकावत चाकूचा धाक दाखवून पल याच्या खिशातून एक मोबाईल व चार हजार रुपये, प्रसाद याच्या खिशातून मोबाईल व १० हजार रुपये रोख तर आदित्यच्या खिशातून एक मोबाईल हिसकावून तिघांनी पळ काढला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी. जी.रोहोम, विजय पाटील, रवींद्र गिरासे, चंद्रकांत पाटील, विजय श्यामराव पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, विकास वाघ, मिलिंद सोनवणे, सचिन महाजन व गफूर तडवी आदींचे पथक या गुन्ह्यावर काम करीत होते.रस्ता लूट करणाºया दोघांना अटकवित्तीय संस्थेची वसुली करुन घरी परत येणाºया कर्मचाऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांच्याजवळील १ लाख ९१ हजार २०७ रुपयांची रोकड असलेली बॅग लुटून नेणाºया दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. मुन्ना भिमलाल बारेला (३५) व रमेश रुमाल्या बारेला (२५ दोन्ही रा.गारखेडा, ता.रावेर) अशी दोघांची नावे आहेत. अनिल जयराम बोरसे (२६, रा.धार, ता.धरणगाव) व रोहित साहेबराव आखाडे या दोघं जण ९ जानेवारी रोजी रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात बचत गटाच्या हप्त्याची वसुली करण्यासाठी गेले होते. १२ केंद्रावरुन १ लाख ९१ हजार २०७ रुपयांची रोकड घेऊन हे दोघं दुचाकीने परत येत लालमाती ते अभोडा दरम्यान रसलपुरकडे जाणाºया रस्त्यावर दोघांना दुचाकीवरुन खाली पाडून त्यांच्याजवळील बॅग घेऊन पळ काढला होता.पोलिसाशी घातली हुज्जतदीपक माळी हा गाडगेबाबा चौक परिसरात एका मंदिराजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे विजय श्यामराव पाटील यांना मिळाली होती.त्यानुसार पाटील व सचिन महाजन हे दोघंही तातडीने तेथे पोहचले असता, त्याने पोलिसांना ओळखले नाही. नंतर पोलीस असल्याचे समजताच त्याने हुज्जत घालून विजय पाटील यांच्याशी झटापट करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो दोघांनी हाणून पाडला. या कर्मचाºयांनी नंतर पथक बोलावून घेतले. दीपक हा सराईत गुन्हेगार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव