शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यातच तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 12:44 IST

जळगाव : एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्या सागर दगडू रावते (२५, रा.अट्रावल, ता. यावल) या तरुणाने गुन्हा दाखल होण्याच्या ...

जळगाव : एकतर्फी प्रेमातून तरुणीला त्रास देणाऱ्या सागर दगडू रावते (२५, रा.अट्रावल, ता. यावल) या तरुणाने गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने पोलीस निरीक्षकाच्या दालनातून बाहेर निघताच जंतूनाशक औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात घडली. सागर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील तरुण व तरुणी फैजपूर येथील महाविद्यालयात सोबत शिक्षण घेत होते. या काळात विविध शालेय कार्यक्रम, सहली व स्पर्धांच्या निमित्ताने सर्वच विद्यार्थी, विद्यार्थिनिंनी एकत्र फोटो काढलेले होते. तेथे या तरुण व तरुणीची ओळख झाली होती. आता या तरुणीचा जून महिन्यात विवाह झाला असून ती पती व सासरच्या मंडळीसह रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहे.लग्न झाल्याचे लागले जिव्हारीदरम्यान, या तरुणीचे लग्न झाल्याने या तरुणाच्या जिव्हारी लागले. त्याने एकतर्फी प्रेमातून तरुणीला काही दिवसापासून त्रास द्यायला सुरु केला आहे. तिला तसेच तिच्या पती व दिराला फोन करुन उलटसुलट माहिती देणे असे उद्योग सुरु केले. त्याच्यासोबत आणखी दोन तरुणही असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनी शालेय जीवनातील फोटो तरुणीच्या पती व दिराला पाठविल्यानंतर या तरुणीच्या कुटुंबात वाद निर्माण झाला. अवघ्या तीन महिन्यापूर्वी सुरु झालेला संसार मोडण्याच्या मार्गावर आल्याने तरुणी व तिच्या पतीने बुधवारी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.तक्रारीवरुन चौकशीला बोलावलेतरुणीने दिलेल्या तक्रार अर्जावरुन रामानंद नगर पोलिसांनी या तरुणाला बुधवारी तरुणाला चौकशीसाठी बोलावले होते. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी त्यांच्या दालनात या तरुणाची चौकशी केली. यावेळी तरुणीलाही बोलावण्यात आले होते. त्याच्यासोबत वडील व भाऊ असे आले होते. तरुणी तक्रार देण्यावर ठाम असल्याने हा तरुण हादरला. गुन्हा दाखल झाला तर जेलची हवा खावी लागेल, ही भीती त्याच्या मनात निर्माण झाली, त्यामुळे बडगुजर यांच्या दालनाच्या बाहेर निघताच त्याने खिशातून जंतुनाशक औषधाची बाटली काढली आणि त्याच्यातील औषध प्राशन केले. यानंतर त्याला लगेच उलट्या होऊ लागल्या. बडगुजर यांनी त्याला तातडीने रुग्णालयात रवाना केले.सोशल मीडियावर तरुणीचे अश्लिल फोटो व व्हिडीओ केले व्हायरलया घटनेप्रकरणी पीडित तरुणीने सायंकाळी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन सागर दगडू रावते व सुमीत पाटील (रा.अट्रावल, ता.यावल) या दोघांविरुध्द विनयभंग व आयटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल झाला.तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार सागर व सुमीत या दोघांनी तुझ्या नवºयाला समजू द्यायचे नसेल तर आम्ही सांगू तसे वाग असे फोन करुन धमकावले. त्यानंतर तरुणीचा पती व दिर यांच्या मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठविले व तसेच तिला तुझे पूर्वीचे किस्से आम्हाला माहिती आहेत, तिचे चारित्र्य चांगले नाही असा उल्लेख त्यात केला. त्याशिवाय युट्युबची लिंक पाठविली असता त्यात अश्लिल फोटो व व्हिडीओ होते. तरुणीचा संसार होऊ नये तसेच बदनामी होऊ या हेतूनेच त्याने हे व्हायरल केले. दरम्यान, तरुणीचा ई-मेल आयडीचाही गैरवापर करुन अश्लिल व्हीडीओ व फोटो व्हायरल केले. दरम्यान, पोलिसात तक्रार दिली पतीसह तरुणीला तलवारीने कापून टाकण्याची धमकी सागरने दिली.संबंधित तरुण व त्याचा मित्र या दोघांविरुध्द विनयभंग व आयटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. सागरविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. संशयितांना लवकरच अटक केली जाईल.-अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव