शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मित्राला फोन करुन तरुणाने घेतली जळगावात पुलावरुन उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:07 IST

मी वाढदिवसाला येऊ शकत नाही, तुम्ही आनंद साजरा करा...असा औरंगाबादच्या मित्राला फोन करुन रुपेश ज्ञानेश्वर महाजन (२१, रा.देवगाव, ता.चोपडा) या तरुणाने विदगावच्या तापी नदीवरुन उडी घेऊन जीवन संपविल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजता घडली.लहानपणापासून आजोबांनी वाढविले. आता त्यांची प्रकृती खालावली आहे. आई, वडीलांनी सांभाळ न करता तिरस्कार केला त्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्दे आई, वडीलांनी सांभाळ न केल्याचे कारण म्हटला, वाढदिवसाला मी येऊ शकत नाही ! सहा महिन्यापूर्वीच लागला होता कामाला

जळगाव : मी वाढदिवसाला येऊ शकत नाही, तुम्ही आनंद साजरा करा...असा औरंगाबादच्या मित्राला फोन करुन रुपेश ज्ञानेश्वर महाजन (२१, रा.देवगाव, ता.चोपडा) या तरुणाने विदगावच्या तापी नदीवरुन उडी घेऊन जीवन संपविल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजता घडली.लहानपणापासून आजोबांनी वाढविले. आता त्यांची प्रकृती खालावली आहे. आई, वडीलांनी सांभाळ न करता तिरस्कार केला त्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश हा सहा महिन्यापूर्वीच औरंगाबाद येथे कंपनीत कामाला लागला होता. तेथे एका खोलीत तो मित्रांसोबत राहत होता. ११ जून रोजी तो औरंगाबाद येथून देवगाव येथे आजोबांकडे आला होता. औरंगाबाद येथे खोलीत राहणाºया मित्राचा वाढदिवस होता. त्यासाठी रुपेश जाणार होता. १२ रोजी त्याने रात्री मित्र राहूल तरटे याला फोन केला की, मी वाढदिवसाला येऊ शकणार नाही, तुम्ही एन्जॉय करा... असे सांगून त्याने विदगावच्या तापी पुलावरुन उडी घेतली. नदीत पाणी नसल्याने छाती व डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.रस्त्यावरुन जाणाºयांनी पाहिली घटनारुपेश नदी किनाºयावर होता. त्याच्या मनात काही तरी विचार येत असावेत असे रस्त्याने जाणाºया, येणाºयांना वाटले. तितक्यात काही कळण्याच्या आत रुपेशने पुलावरून उडी घेतली. ही माहिती लोकांनी विदगावच्या पोलीस पाटलाला कळविली. तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर बीट अमलदार साहेबराव पाटील व अरुण सोनार यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह रात्री १ वाजता जिल्हा रुग्णालयात आणला. दरम्यान, त्याच्या खिशात असलेले कंपनीचे ओळखपत्र व इतर कागदपत्रावरुन रुपेशची ओळख पटली. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.औरंगाबादच्या मित्राला आली शंकारुपेश याने राहूल तरटे याला फोन केल्याने त्याच्या बोलण्यातून राहूल याला संशय आला. त्याने कंपनीत काम करणारे रुपेशचे चुलत काका सोपान विक्रम महाजन यांना माहिती दिली. त्यांनी देवगाव येथे फोन करुन रुपेशचा शोध घेण्याचे सांगितले. रात्री शोध घेत असतानाच त्याने आत्महत्या केल्याची बातमी औरंगाबादला धडकली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव