जळगाव : डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य न पाळल्याबद्दल आई रागावल्याने त्या संतापात परेश बापू मराठे (२२, रा.चौघुले प्लॉट, जळगाव) या तरुणाने लेंडी नाला पुलाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी साडे तीन वाजता घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश मराठे याची प्रकृती वारंवार बिघडत असल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्याला काही पथ्य पाळायला सांगितले होते, मात्र परेश याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ‘तुझ्यावर इतके पैसे खर्च केले तरी तू पथ्य पाळत नाही’ असे बोलून आई त्याला रागावली. त्याचा राग आल्याने परेश याने संतापात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. कामावर जातो असे सांगून तो घराबाहेर पडला होता.लेंडी नाला पुलाजवळ धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत एका तरुणाने आत्महत्या केल्याची लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
आई रागावल्याने जळगावात तरुणाने केली रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:02 IST
डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य न पाळल्याबद्दल आई रागावल्याने त्या संतापात परेश बापू मराठे (२२, रा.चौघुले प्लॉट, जळगाव) या तरुणाने लेंडी नाला पुलाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी साडे तीन वाजता घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आई रागावल्याने जळगावात तरुणाने केली रेल्वेखाली आत्महत्या
ठळक मुद्देलेंडी नाला पुलाजवळील घटनाडॉक्टरांचे पथ्य पाळले नाही म्हणून रागावली आई