शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून जळगावात तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:35 IST

रेल्वेखाली घेतली उडी

जळगाव : आईने नवीन मोबाईल घेऊन देण्यास नकार दिला म्हणून सुमेध काकासाहेब भालेराव (खंबाळकर) वय २३, रा.हिरा शिवा कॉलनी, जळगाव या तरुणाने धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी रामानंद पोलीस स्टेशनला आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेल्या परिचारिका लिलाबाई भालेराव या खोटे नगरातील हिरा शिवा कॉलनीत वास्तव्याला आहेत. पती मुंबईला असल्याने मुलगा सुमेध हा जळगावला त्यांच्याजवळच होता. तीन दिवसापूर्वीच तो मुंबईहून परत आला. सोमवारी सायंकाळी त्याने आईला नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी आग्रह केला. त्यावर आईने दोन मोबाईल असतांना नवीन मोबाईल गरज काय असे म्हणत त्याला मोबाईल घेवून देण्यास नकार दिला. यावर सुमेधने आईशी भांडण केले. इतकेच काय त्याने आईचा हातही पिरगळला. वाद झाल्यानंतर मी आता आत्महत्याच करतो असे सांगून तो रात्री आठ वाजता घराबाहेर पडला.अशी पटली ओळखरामानंद नगरचे विनोद शिंदे व विजय जाधव यांनी घटनास्थळ गाठले असता सुरुवतीला मयताची ओळख पटत नव्हती. मोबाईल आढळून आले, मात्र तो लॉक असल्याने मर्यादा येत होता. मृतदेहापासून काही अंतरावर दुचाकीही असल्याने तिचा क्रमांक आॅनलाईन वाहन अ‍ॅपमध्ये टाकला असता त्यात भालेराव नाव आहे. त्यामुळे पोलिसांनी भालेराव नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला असता तीन नावे पोलिसांचीच निघाली. तरीही ओळख पटत नव्हती. त्यामुळे शिंदे यांनी काही नगरसेवकांशी संपर्क केला असता त्यातही अपयश आले. सकाळी घटनास्थळी गर्दी झाल्याचे पाहून रुपेश प्रवीण राणे हा तरुण घटनास्थळाकडे आला असता त्याने सुमेधला व त्याची दुचाकी ओळखली.शिव कॉलनी पुलाजवळ केली आत्महत्याआईशी वाद घातल्यानंतर सुमेध हा दारु प्यायला गेला. त्यानंतर दुचाकी (एम.एच.क्र.१९ डी.एक्स. ०१४९) घेऊन तो शिव कॉलनी पुलाजवळील रेल्वे रुळाजवळ गेला. तेथे बाजुला दुचाकी लावून खांब क्र. ४१७२ ते २६ च्या दरम्यान कोणत्यातरी धावत्या रेल्वेखली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. रात्री साडे बारा वाजेनंतर ही घटना घडली आहे. रेल्वे स्टेशन उपप्रबंधक अरुण देशमुख यांनी पहाटे तीन वाजता रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावरुन सकाळी हेडकॉन्स्टेबल विनोद शिंदे व विजय जाधव यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.एकुलता असल्याने लाडकालिलाबाई यांना सुमेध हा एकुलता मुलगा होता. वडील मुंबईत आरपीआयचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्याचे प्रचंड लाड केले जात असत. लाडका असल्याने हवी ती वस्तू त्याला मिळत होती. सद्यस्थितीत त्याच्याकडे दोन महागडे मोबाईल होते. दरम्यान, याआधी देखील त्याने किरकोळ कारणावरुन वाद घालून आत्महत्येची धमकी आईला दिली होती रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात तो डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला होता, मात्र त्याने ते शिक्षणही अर्धवट सोडून दिल्याची माहिती मिळाली. आता त्याच्यासाठी अमरावतीचे स्थळही आले होते.मुलांना नकार पचवायची सवय नसते. त्यामुळे एखादी वस्तू किंवा मनासारखे झाले नाही तर मुलगा बेचैन होता. त्यासाठी लहानपणापासून त्यांना स्पष्टपणे नकार द्यावा. आई, वडीलही त्याला जबाबदार आहेत. कुटुंबातील संवाद कमी होत चालला आहे. मुलगा चुकला असेल तर डोक्यावर हात फिरवून त्याला जवळही घ्यावे.-प्रतिभा हरणखेडकर, समुपदेशक

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव