भडगाव : तालुक्यातील पिंपरखेङ येथील २४ वर्षीय तरुण पवन शिवदास नेरपगार याने राहत्या घराच्या छताच्या लाकडी सऱ्यास साडीने गळफास घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही ७ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली.याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार किरण ब्राम्हणे हे करीत आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
गळफास घेवून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 15:40 IST