शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बिलाच्या मुद्यावरून तरूणांनी घातला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 23:49 IST

होमगार्डशी घातली हुज्जत : शहर पोलीस ठाण्यात जमली गर्दी

जळगाव- रेल्वे स्टेशन परिसरातील बिअरबारमध्ये दोन तरूणांनी मद्यप्राशन केल्यावरून बिल देण्यावरून वाद घातला़ त्याठिकाणी होमगार्ड आल्यानंतरही त्याच्याही दोघांनी हुज्जत घालत धिंगाना घातल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला़ त्यानंतर त्या दोघांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते़ विजय सुभाष मोरे (रा़ मानसिंगनगर, पाचोरा) तसेच शांताराम नाना पाटील (रा़ शनिमांडळ) असे दोन्ही तरूणांची नावे आहेत.विजय मोरे व शांताराम पाटील हे दोघं मित्र बुधवारी सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलात मद्य प्राशन करण्यासाठी आले होते़ मात्र, त्यानंतर बिल देण्याच्या कारणावरून हॉटेलात वाछ झाला़ यावेळी हॉटेल मालकाने जवळील चौकीत प्रकार सांगितल्यानंतर एक होमगार्ड त्याठिकाणी आला़ मात्र, त्या होमगार्ड सोबत दोघांनी हुज्जत घातली. त्यानंतर आमचा नातेवाईक पोलिसात आहे, असे सांगत पोलीस कर्मचाऱ्यांशीही त्यांनी वाद घातला. काहीवेळानंतर दोघांना शहर पोलिसात आणण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आवारातही दोघांनी धिंगाणा घातला़ त्यामुळे चांगलीच गर्दी जमली होती़ पोलिसांनी दोघांची विचारपूस केल्यानंतर विजय मोरे याने सांगितले की, आपण दिल्ली येथुन आलो. आपल्या खिशात पैसे होते. परंतु हॉटेलमध्ये कोणी तरी खिशातून पैसे काढुन घेतले. आम्ही मद्यपान केले, कोणाशीही वाद घातला नाही,असे त्यांनी सांगीतले. दरम्यान दोघांचे मोबाईल पोलिसांनी जप्त करून प्रतिबंधात्मक कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव