शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:59 IST

जळगाव : घरगुती भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाला लाकडी दांड्याने मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील म्हसावद ...

जळगाव : घरगुती भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाला लाकडी दांड्याने मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे गुरूवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. यात लहान भावास अटक करण्यात आली आहे.जितेंद्र प्रकाश इंगळे (कोळी) (३०) असे या मृत इसमाचे तर संदीप प्रकाश इंगळे (कोळी) अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़म्हसावद येथील खडसे नगरात जितेंद्र इंगळे हा लहान भाऊ संदीप आणि आई प्रमिलाबाई यांच्यासह वास्तव्यास होता़ जितेंद्र याला दारूचे व्यसन होते़ गुरूवारी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान जितेंद्र आणि संदीप या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले़ जितेंद्र हा दारूच्या नशेत शिवीगाळ करीत होता़ यात संतापाच्या भरात संदीप याने मोठ्या भावास लाकडी दांड्याने मारहाण केली़ डोक्यात लाकडी दांडका बसल्याने त्यातच मोठा भाऊ जितेंद्र याचा मृत्यू झाला.भांडण सोडविण्यासाठी आले अन् त्यांनाही झाली मारहाणशेजारी राहणारे दशरथ धरमसिंग वाघेले यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, संदीपने त्यांच्यावरही हल्ला चढविला अन् त्यांच्या हातावर व डोक्यावर काठी मारून त्यांना जखमी केले. जितेंद्रचा मामा दशरथ गंगाराम कोळी तेथे आला. त्यांनी जखमींना उपचारार्थ नेले़ परंतु, जितेंद्र याचा मारहाणीमुळे मृत्यू झाल.गावातून केली अटकमोठ्या भावाची हत्या केल्यानंतर संशयित लहान भाऊ हा म्हसावद गावात लपून बसला होता़ त्याचा शोध घेवून पोलीस कॉन्स्टेबल समाधान पाटील, स्वप्नील पाटील अशांनी त्यास ताब्यात घेतले़ त्याची कसून चौकशी केल्यानंतर गुन्हा कबुल केला़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक डॉ़ नीलाभ रोहन, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव