जळगाव : मेहरुणमधील शिवाजी उद्यानात रविवारी दुपारी साडे तीन वाजता एका तरुणीला तरुणाने काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. तरुण त्याच्या चार ते पाच मित्रांसोबत आलेला होता. तरुणीने तोंडाला मास्क बांधलेला होता. हा तरुण हातातील बारीक काठीने सपासप तिला मारत असतानाच तेथे गेलेले शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख राहूल नेतलेकर, नितीन तमायचे व आकाश रायचंदे या भागातून जात असताना त्यांनी तरुणाला मारहाणीचा जाब विचारला.दरम्यान, तरुण व तरुणी दोघंही आंतरजातीय असून प्रेमविवाह केल्याचा दावा तरुणाकडून केला जात होता.हा तरुण या तरुणीला मारहाण करीत असताना त्याचे मित्र बघायचे काम करीत होते. नेतलेकर यांनी या प्रकरणाचा व्हीडीओ तयार करुन फोटोही घेतले आहेत. एकूण हा सारा प्रकार संशयास्पद वाटत असल्याचे नेतलेकर यांनी सांगितले.
मेहरुणमधील शिवाजी उद्यानात तरुणीला काठीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:39 IST