शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तरुणावर गोळी झाडून अधिकाऱ्याला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:12 IST

पिंपळकोठा व जानवे जवळ थरार

जळगाव /पारोळा/वडजाई ता. धुळे : पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा येथे पिल्लूकदेव यात्रेत भांडण सोडविण्यास गेलेल्या युवकावर एकाने गावठी पिस्तुलने गोळी झाडली. तिथून लागलीच जानवे, ता.अमळनेर गावाकडून धुळ्याकडे कारने जात असलेले राज्य कर अधिकारी विजय मगन सोनवणे (३८, रा.धुळे) यांना चौघांनी अडविले आणि पिस्तुलचा धाक दाखवून त्यांच्याकडील २१ हजार रुपये रोख व सोबतच्या तिघांचे मोबाईल लुटून नेले. मंगळवारी रात्री १०.३० व ११ वाजता घडल्या. अर्ध्या तासाच्या अंतरात दोन ठिकाणी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे एकच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत चारही लुटारु निष्पन्न झाले असून त्यांनी अमळनेरातून एक दुचाकी चोरली आहे. जगदीश पुंडलिक पाटील (१८, रा.पिंपळकोठा,ता.पारोळा), गौरव विजय पाटील (१८, रा.अमळनेर), सागर पाटील (१९, रा.अमळनेर) व जगदीश उदय वाघ (२०, रा.सांगवी, ता.शिरपूर) अशी चौघांची नावे असून जगदीश वाघ हा या तीन जणांना पुढे जावून मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या चौघांच्या शोधासाठी पारोळा, अमळनेर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची निम्मे फौज रवाना झाली आहे तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी अमळनेरात तळ ठोकला आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळी भेट देवून जखमीचीही माहिती घेतली.चौघे रेकॉर्डवरील गुन्हेगारगौरव, सागर व तसेच जगदीश पाटील व जगदीश वाघ हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. वाघ हा तर पंधरा दिवसापूर्वीच पोलीस कोठडीतून बाहेर आला आहे. शिरपुर पोलिसांच्या कोठडीत तो होता. तेथून सुटल्यानंतर त्याने लुटमारीचा गुन्हा केला. दरम्यान, वाघ वगळता तिघांनी अमळनेर येथून एक महागडी दुचाकी चोरी केली, त्यानंतर या दुचाकीवरुन तीन जण निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली.भांडण सोडायला जाणे पडले महागातजगदीश पाटील व यशवंत सुभाष पाटील यांच्यातील सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी चनेश्वर नथू पाटील (३०, रा. पिंपळकोठा) हा तरुण गेले असता त्याचे वाईट वाटून जगदीश याने त्याच्यासोबत असलेल्या तीन ते चार अनोळखी व्यक्तीनी वाद घातला. त्यानंतर जगदीश याने गावठी कट्ट्याने चनेश्वर यांच्या छातीवर गोळी झाडली. तसेच सोबतच्या साथीदारांनीही मारहाण करून दमदाटी केली. यात चतेश्वर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पारोळा पोलिसात खुनाचा प्रयत्न व आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत. पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र्र ससाने, अमळनेरचे निरीक्षक अंबादास मोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली.दगडाने फोडला कारचा काचसागर, गौरव व दोघं जगदीश या चौघांनी रात्री ११ वाजता जानवेपासून जवळच असलेल्या डांगरगावाजवळ कर अधिकारी विजय सोनवणे यांच्या कारच्या (एम.एच.१९ बी.यु.२१४४) पुढे दोन दुचाकी आडव्या लावल्या. एकाने कारच्या खिडकीची काच खाली करायला लावून चालक दीपक कैलास नांद्रे (रा.धुळे) यांच्यावर पिस्तुल रोखला. त्यानंतर कारमधील व्यंकट गोविंद मेकाले (रा.नेरुळ, मुंबई) व अनिल वळवी (रा.रायपुर, ता.नवापुर, जि.नंदूरबार) यांनाही धमकावले. एकाने दगडाने कारची काच फोडली. या चौघांजवळील २१ हजार रुपये रोख व चार मोबाईल घेऊन पोबारा केला. दरम्यान, या चौघांसोबत आणखी दोन जण असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांच्या मागावर असून उद्यापर्यंत ते हाती लागतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.गोळीबारातील जखमीचे धुळ्याशी संबंधवडजाई, ता.धुळे : पिंपळकोठा या गावात यात्रोत्सवात तमाशा सुरू असताना अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने जखमी झालेले चेनेश्वर पाटील, रा.पिंपळकोठा हे गरताड, ता.धुळे येथील माजी पंचायत समिती सभापती सखाराम त्र्यंबक पाटील यांचे बंधू विश्वास पाटील यांचे जावई आहेत. धुळे येथील खाजगी रुग्णालयात गोळी काढण्यात डॉक्टरांना यश आले. बुधवारी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव