शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

पत्नी माहेरी गेल्याच्या नैराश्येतून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 12:54 IST

जळगाव-शिरसोली रेल्वे मार्गावरील घटना : पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव :खंडेराव नगरातील ३५ वर्षीय तरूणाने नैराश्यातून स्वत:ला धावत्या रेल्वेखाली झोकून देवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रमेश दगडू भोई (रा. नशिराबाद, ह.मु.खंडेराव नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

रमेश हा खंडेराव नगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास होता़ शेंगदाणे व फुटाणे विकण्याचे काम करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करायचा़ दरम्यान, पती-पत्नीत कौटूंबिक वाद झाल्यामुळे पत्नी ही मुलासह माहेरी निघून गेली़ त्यामुळे खंडेराव नगरात आई कमलाबाई वडील दगडू भोई आणि भाचा अभिजित भोई यांच्यासोबत रमेश हा राहत होता़ गेल्या चार ते पाच वर्षांपासून पत्नी माहेरी गेल्याने नैराश्येतून रमेश हा गुरूवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला.

खूप वेळ झाल्यामुळे मामा घरी न आल्याने भाचा अभिजित याने रात्रभर शोधाशोध सुरू केली़ परंतु, मामा कुठेही दिसून आला नाही़ दरम्यान, शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जळगाव -शिरसोली दरम्यान रेल्वे डाऊन खंबा क्रमांक ४२४ ते ४२६ दरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रामांनद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पो.कॉ. विश्वनाथ गायकवाड करीत आहेत.कामाच्या शोधात जळगावात आलेल्या तरूणाची आत्महत्याहाताला काम नसल्यामुळे कामाच्या शोधात जळगाव शहरात आलेल्या तरूणाने गुरूवारी मध्यरात्री झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना एमआयडीसी भागात घडली आहे़ भिम मुन्ना राठोड (३० रा़ उमऱ्या, ता़ शिरपूर, जि़ धुळे) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे़लॉकडाऊनमुळे भिम राठोड याच्या हाताला काम नव्हते़ काम मिळेल यामुळे तो काही महिन्यांपूर्वी शहरातील गुरांच्या बाजार परिसरात वास्तव्यास असलेले सासरच्या मंडळींकडे राहण्यासाठी आला होता़ नंतर त्याला बांधकाम मिस्तरीचे काम मिळाले़दरम्यान, गुरूवारी मध्यरात्री भिम हा अचानक घरातून बाहेर निघाला़ त्याने घराबाहेर असलेल्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. जावयाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सासुच्या लक्षात आल्यानंतर घटना उघडकीस आली़मयताच्या पश्चात पत्नी सविता, मुली असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास संतोष पाटील करीत आहे.शिव कॉलनीत चक्कर येऊन पडल्याने महिलेचा मृत्यूजळगाव : चक्कर येऊन पायरीवरुन खाली पडल्याने ८० वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शिवकॉलनीत गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.शेवंताबाई श्रावण महाजन (८०, रा़ हनुमान नगर, धरणगाव) असे मयत वृध्द महिलेचे नाव आहे़ शेवंताबाई महाजन या घरात कोणाला काहीही न सांगता २ आॅगस्टपासून निघाल्या होत्या. शिवकॉलनी स्टॉप परिसरात अनोळखी म्हणून फिरत होत्या. गुरूवारी शिव कॉलनीतल्या रिक्षा स्टॉपसमोरील एका दुकानाच्या ओट्यावर त्या बसल्या होत्या. अचानक त्यांना चक्कर आल्याने त्या पाचव्या पायरीवरून खाली कोसळल्या़त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूबाबत नोंद करण्यात आली होती. दरम्यान, वृध्देजवळील कागदपत्राच्या आधारे शुक्रवारी सकाळी नातेवाईकांकडून ओळख पटली. नंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात मृतदेहावर शवविच्छेन करण्यात आले. तपास हे.कॉ. सतीश डोलारे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव