शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘क्रॉसबार’ला धडक बसल्याने तरुण ठार

By admin | Updated: March 19, 2017 01:02 IST

शिवाजीनगर उड्डाणपुलावर अपघात : मालवाहू रिक्षाच्या छतावर बसलेल्या करंज येथील तरुण शेतकºयाचा मृत्यू

जळगाव : शेतातील टोमॅटो मालवाहू रिक्षातून कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत असताना रिक्षाच्या टपावर बसलेला महेंद्र निंबा धनगर (वय २० रा.करंज, ता.जळगाव) हा तरुण शेतकरी शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या क्रॉसबारला धडक बसल्याने ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.शिवाजीनगर उड्डाणपुलावर    सकाळी ६ वाजता अपघातमहेंद्र धनगर हा तरुण गावात शेती करतो. शुक्रवारी आई व त्याने शेतातून टोमॅटो घरी आणले.  ते कठोरा येथील रिक्षा चालक योगराज सपकाळे याच्या मालवाहू रिक्षातून (क्र.एम.एच. १९ एस.९७४२) शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणत असताना सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. चालकाजवळून उतरुन बसला टपावरकरंज गावापासून तो चालकाच्या शेजारी बसला होता, मात्र  आमोदा गावाजवळ तो रिक्षाच्या टपावर बसला.  सपकाळे याने रिक्षा शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळील क्रॉसबारच्या खालून काढली, मात्र महेंद्र हा टपावर बसलेला असल्याने त्याच्या डोक्याला क्रॉसबारचा              जोरात पाईप लागला, त्यात तो रिक्षाच्या टपावरुन जमिनीवर  फेकला गेला. चालकाच्या मात्र हा प्रकार लक्षात आला नाही. पुढे गेल्यावर नागरिकांनी रिक्षा चालकाला थांबविले. महेंद्र फेकला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. नागरिकांनी धावपळ करत त्याला हलविले. महेंद्र याला संदीप हा मोठा भाऊ असून बहिणी कल्पना व मनीषा या विवाहित आहेत. कल्पना मंगरुळ, ता.चोपडा तर मनीषा हिचे पिंप्राळा, जळगाव येथे सासर आहे. आई मालतीबाई या देखील शेतीच करतात. दोन्ही भाऊ अविवाहित आहेत. शेतात भाजीपाल्याचे उत्पन्न घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अडीच तास मृत्यूशी झुंजमहेंद्र याच्या मेंदूला जबर मार बसला होता. शरीराच्या अन्य कोणत्याही भागाला त्याला इजा झालेली नाही, किंवा रक्ताचा एक थेंबही बाहेर आलेला नव्हता. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर फुपणीचे सरपंच डॉ.कमलाकर पाटील यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठले. महेंद्रची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनी त्याला तातडीने अतिदक्षता कक्षात हलविले. तज्ज्ञ डॉक्टरांना यावेळी पाचारण करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना साडे आठ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे...तर महेंद्रचा जीव वाचला असतामहेंद्र हा गावापासून चालकाच्या शेजारी कॅबीनमध्ये बसला होता. त्यानंतर तो आमोदा गावापासून मागे बसला. तो कॅबीनमध्ये थांबला असता तर हा अपघात झाला नसता. महेंद्र हा टपावर बसला असताना मोबाईलमध्ये गुंग  होता, क्रॉसबारकडे त्याचे लक्ष नव्हते. लक्ष गेले तेव्हा बचाव करण्याच्याआधीच त्याला पाईप लागला. मोबाईलमध्ये गुंग झाला नसता तर त्याचा जीव वाचला असता.मुलाच्या मृत्यूच्या वृत्ताने वडील सुन्नमुलाचा अपघातात झाल्याचे कळताच वडील निंबा वामन धनगर यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यापाठोपाठ अन्य नातेवाईक दाखल झाले. साडे आठ वाजता महेंद्रची प्राणज्योत मालवली, मात्र बराच वेळ वडिलांना त्याची माहिती देण्यात आली नाही, नंतर मात्र त्यांना सांगण्यात आले. मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांना जोरदार धक्का बसला. यावेळी ते सुन्न झाले होते.