शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
5
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
6
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
7
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
8
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
9
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
10
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
11
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
12
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
13
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
14
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
15
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
16
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
17
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
18
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
19
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
20
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!

अल्पवयीन मुलीनेच पळविले मुलाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:47 IST

अपहरणाचा गुन्हा दाखल : आईशी भांडण झाल्याने मुलीने सोडले घर

जळगाव : प्रेमप्रकरणातून मुलाने मुलीला पळविले असे आपण नेहमीच ऐकतो.. पाचोरा तालुक्यात मात्र अल्पवयीन मुलीनेच मुलाला जबरदस्तीने पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोघांना पिंपळगाव हरेश्वर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपरी-चिंचवड येथून ताब्यात घेतले. रविवारी दोघांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून १६ वर्षाची मुलगी २६ जुलै रोजी घरातून गायब झाली होती. आजारी असल्याने आईने तिला पाचोरा येथे दवाखान्यात जाण्यासाठी खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनात बसविले होते. सायंकाळी उशिर झाला तरी मुलगी घरी न आल्याने आईने मुलाला तिचा शोध घ्यायला सांगितले. मुलाने पाचोरा शहरातील सर्व दवाखाने, रेल्वे स्टेशन व बसस्थानक येथे शोध घेतला, मात्र कुठेच माहिती मिळाली नाही तसेच नातेवाईकांकडेही मुलगी नसल्याने कुटुंबाची अधिकच चिंता वाढली होती. याप्रकरणी २७ रोजी आईच्या फिर्यादीवरुन कोणी तरी फूस लावून तिचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.पिंपरी चिंचवड येथे घेतला आश्रयया मुलीने गावातील एका अल्पवयीनच मुलाला सोबत जबरदस्तीने सोबत घेऊन थेट पुण्यातील पिंपरी चिंचवड गाठले. तेथे त्यांनी मुलाच्या बहिणीकडे आश्रय घेतला. हे प्रकरण अंगाशी येवू शकते या भीतीने मुलाच्या बहिणीने पोलिसांना कळविण्याची तयारी केली, मात्र मुलीने त्यांना त्यापासून रोखले. दुसरीकडे अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापु रोहोम व पिंपळगावचे सहायक निरीक्षक रवींद्र बागुल यांना स्वतंत्रपणे तपास पथके रवाना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथके औरंगाबाद, पाचोरा येथे मुलीचा शोध घेत असताना या मुलीसोबत एक मुलगा असून दोघंही पिंपरी चिंचवड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपळगाव हरेश्वरचे कॉ.राकेश खोंडे, सविता ठाकरे व शिवनारायण देशमुख तर एलसीबीचे विजय पाटील, नरेंद्र वारुळे व दिनेश बडगुजर यांचे पथक पुण्यात धडकले. दोघांना मुलाच्या बहिणीच्या घरुन ताब्यात घेऊन पिंपळगाव येथे आणले. मुलीने तक्रार न दिल्याने दोघांचा जबाब घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव