जळगाव- आर.सी. बाफना ज्वेलर्समध्ये संगणक विभागात महत्वाच्या पदावर असलेल्या प्रकाश खंडू चौधरी (३५, रा.पळासखेडे मिराचे, ता.जामनेर) या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश चौधरी हा तरुण गेल्या ११ वर्षापासून शहरातील आर.सी.बाफना ज्वेलर्समध्ये संगणक विभागात नोकरीला होता. रोज पळासखेडा येथून तो जळगावला दुचाकीने ये-जा करायचा. दोन दिवसापासून तो ड्युटीवर नव्हता, मात्र बुधवारी सकाळी ९ वाजताच तो पळासखेडा येथून घरुन जळगावकडे यायला निघाला. सकाळी साडे अकरा वाजता त्याने मित्र तथा सोबत कामाला असलेला अमोल पाटील याला मोबाईलवर संपर्क केला. मी चिंचोली शिवारातील महाविद्यालयाजवळ आहे असे सांगितले, त्यानंतर त्याला उलटी झाली. काय झालं म्हणून अमोलने विचारले असता ‘मी औषध घेतले आहे, तु कुणाला सांगू नको, माझी बदनामी होईल’ असे सांगून फोन कट केला.दोन तासाच्या शोधानंतर सापडला मृतदेहकाही तरी संशयास्पद प्रकार असल्याची जाणीव झाल्यानंतर अमोल पाटील याने मित्र गजानन पाटील यांना सोबत घेऊन चिंचोली शिवारातील पी.ई.तात्या पाटील यांच्या महाविद्यालयाच्या परिसरात प्रकाशचा शोध घेतला, मात्र दोन तासानंतरही शोध लागला नाही. त्यामुळे बाफना ज्वेलर्सचे जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील यांनी पोलिसांच्या माध्यमातून प्रकाश याच्या मोबाईलच्या आधारावर शोध घेतला असता चिंचोली गावाच्या पुढे डायट महाविद्यालयाच्या परिसरात प्रकाशचा मृतदेहच आढळून आला.
विष प्राशन करून तरूणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 21:37 IST