शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील तरुण अभियंता पुणे येथे दुचाकी अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 13:03 IST

कुटुंबीयांना बसला धक्का

ठळक मुद्देपोलीस कर्मचाऱ्याचा मुलगायंदा होते लग्नाचे नियोजन

जळगाव : नोकरीनिमित्त पुणे येथे गेलेल्या अक्षय राजेंद्र बडगुजर (वय २५, खोटे नगर,जळगाव) या तरुण अभियंत्याचा पुणे येथे ट्रक अपघातात मृत्यू झाला आहे. १ जून रोजी रात्री आठ वाजता हा अपघात झाला. सोमवारी शहरात त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षय हा जिल्हा पोलीस दलातील हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पंढरीनाथ बडगुजर यांचा एकुलता मुलगा होता.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय याचे बी.ई.पर्यंत शिक्षण झालेले होते. दोन वर्षापासून पुणे येथे खासगी कंपनीत चांगल्या पगारावर तो नोकरीला होता. मित्रांसोबतच तो भाड्याच्या घरात राहत होता.१ जून रोजी मित्रांसोबत तो लोणावळा येथे दुचाकीने फिरायला गेला होता. तेथून परत येत असताना पुण्याजवळ दुभाजकावर वळण घेत असलेल्या ट्रकने अक्षयच्या दुचाकीला धडक दिली. डोक्याला मार लागल्याने त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने दवाखान्यात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.यंदा होते लग्नाचे नियोजनअक्षय हा अविवाहित होता. पुण्यात चांगल्या पगारावर नोकरी असल्याने त्याच्या लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात झाली होती. चांगले दिवस आल्याने कुटुंब आनंदात असतानाच ही दुर्घटना घडली. मुलाच्या मृत्यूमुळे आई व वडीलांना मोठा धक्का बसला आहे.आई, वडीलांना एक दिवस उशिराने कळविलेराजेंद्र बडगुजर यांना अक्षय हा एकुलता मुलगा होता. त्याच्यात आई व वडील यांचा प्रचंड जीव असल्याने त्याच्या मृत्यूची बातमी आई, वडीलांना लवकर कळवलीच नाही. मृतदेह घेऊन सोमवारी दुपारी शववाहिका फर्दापूरजवळ आली तेव्हा त्याच्या आई, वडीलांना घटनेची माहिती कळविण्यात आली. बडगुजर हे मुळ फुपनगरी, ता.जळगाव येथील रहिवाशी आहेत. राजेंद्र बडगुजर पोलीस दलात तर त्यांचा भाऊ संजय बडगुजर यांचा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. बहिणीचे लग्न झालेले आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव