शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुका म्हणे आम्हा एकांताचा वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:42 IST

सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने सर्वांसाठी स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता रोगाच्या निर्मूलनाकरिता स्वत:ला जनतेच्या ...

सद्यस्थितीत कोरोनामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने सर्वांसाठी स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता रोगाच्या निर्मूलनाकरिता स्वत:ला जनतेच्या सेवेत झोकून घेतले आहे. अश्या वेळेस या रोगाला पळवून लावण्यासाठी सर्वांना आपल्या घरातच राहून राष्ट्राच्या सेवेची संधी मिळालेली आहे.पण बरेच जण त्या नियमांचे पालन करत नाहीत. खरं म्हणजे एकांत म्हणजे ज्ञानी मनुष्यासाठी संधी तर मूर्खांसाठी संकट आहे. आज रोजी भक्तीसाठी असो किंवा आपल्यातील असलेल्या कलेला वृद्धिंगत करण्यासाठी सर्वात महत्वाचा म्हणजे असतो तो एकांत. संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर एकांत म्हणजे भगवंताला प्राप्त करण्यासाठी एक संधी समजतो. त्यामुळेच आम्हाला एकांताचा प्रवास सुकर वाटतो आणि तो भगवंतासाठी आपण अर्पण करून आपण निश्चितच भगवंताला प्राप्त करू शकतो.तुकाराम महाराज म्हणतात, माझा जर एकांतात वास घडला तर जगाशी माझा येणारा संबंध टाळून मी आपल्या ध्येयापर्यंत निश्चितच पोहचेल कारण भगवंताची भक्ती असो की ध्येयाकडे वाटचाल ती आपल्याला एकांतानेच साध्य करता येईल.साधकांसाठी नित्य एकांत ही पर्वणीच असते. आपण एकांत निवडला तर आपले गुण-दोष पाहणारे लोक तिथे नसल्याने त्यांचे गुण-दोष हि आपल्या अंगी येत नाही. दोषापासून दूर जाऊन आपण निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. सर्वांनी संतांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या घरातच थांबून एकांत निवडायला हवा व प्रशासनाच्या नियमांचे पालन करायला पाहिजे. जेणेकरून आपण या कोरोनासारख्या रोगाला पळवून लावू शकतो आणि भगवंतही आपल्याला संकटातून लवकरच सावरेल.- गजानन महाराज वरसाडेकर (जळगाव)

टॅग्स :Jalgaonजळगाव