शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

आपण म्हणजे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 15:56 IST

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ललित या सदरात अभ्यासक जयंत पाटील लिहिताहेत खुसखुशीत ‘आपण म्हणजे...’

मी पूर्वी अगदी लँडलाईन काळात मला आवडलेल्या, डायरीत लिहून ठेवलेल्या कविता मित्रांना ऐकवत असे. घरात अनेक नियतकालिके-अनियतकालिके यायची. मंगेश (काळे) मुळे ‘शब्द’वाला रमेश, 'अभिदानंतर'वाला हेमंत दिवटे हे ओळखीचे झालेले... ते हे अंक पाठवायचे.ेएकदा ‘अभिदानंतर’चा दिवाळी अंक २००१ आलेला. त्यातली ‘आपण म्हणजे’ ही पंकज क्षेमकल्याणीची कविता मी महानोरांना ऐकवली. दादांना कविता आवडली. ते म्हणाले, ‘हा कवी नाशिकला रहातो.’ नंतर काही काळातच नाशिकला जाण्याचा योग आला. राजा पाटेकर आणि मी नाशिकच्या मेनरोडवर भटकत होतो. पाठीला सॅक अडकवलेल्या एका उंचपुऱ्या तरुणाशी माझी राजाने ‘हा पंकज क्षेमकल्याणी’ अशी ओळख करून दिली. मी त्याला म्हणालो, ‘‘तुझी ‘आपण म्हणजे’ ही कविता मी महानोरदादांना ऐकवली. त्यांनाही ती आवडली.’’ पंकजने आनंदाने जागच्या जागी उडी मारुन आनंद साजरा केला. पंढरीचा वारकरी दिंडीत अभंग म्हणताना अशीच उडी मारतात, असा भास झाला. हा कविता पंढरीचा वारकरी पाहताना... पंकजचे नुकतेच लग्न झालेले. त्याची पत्नीही कविता करते हेही कळाले... आम्ही घरी गेलो. त्या सावळ्या रखुमाईचे मन:पूर्वक हसू जगण्याचा सन्मान करणारे...पंकजची कविता :‘आपण म्हणजे पाच फूट नऊ इंचाचाएक्झिबिशन हॉल असतोप्रदर्शन भरवायचंय आपल्याला स्वत:चंऐसपैस करूया स्वत:ला म्हणजे थोडंतरी मोकळं मोकळं वाटेलगोळा करा आपल्याकडे असलेल्या गोष्टीनसलेल्या गोष्टींचा आभास निर्माण करा.मांडा प्रदर्शनातशाळेत श्रीगणेशा गिरवलेली पाटी, पाढ्यांची अंकलिपी,गोष्टींची पुस्तकं, गायकवाड मास्तरांची छडी आणिबबनच्या जिंकलेल्या ४१ गोट्याप्रदर्शनात ठेवापंक्चर झालेली नवी कोरी सायकल, आठवतील त्यावर्गमित्रांचे चेहरे, पोपटाच्या आकाराचं खोडरबर,शाळेबाहेरचा रंगीत बर्फवालाविचारा स्वत:ला ओक मॅडमचा चेहरा अजून आठवतो का?हरकत नाही प्रदर्शनात ठेवायलारंगीत दिवसरात्रीच्या अनेक गोष्टी, रात्री-बेरात्री केलेल्या बेभानप्रवासाची तिकिटं, थंडगार रात्रीनंतर उगवलेल्या पहाटेसारखीउबदार हसणारी मैत्रिण, तिच्या आत्महत्येची बातमी देणारं तिच्या भावाचं पत्र,प्रेयसीची दंडाभोवतीची घट्ट मिठी,पावसात भिजतानाची मनात सतत वाजणारी एकटेपणाची सारंगीअनोळखी उन्हाचा डूमउलटसुलट विचारांचा त्रिताल आणि कवितांची वहीसुद्धाआणि खाली लिहायला विसरायचं नाहीकृपया येथील वस्तूंच्या किमती विचारू नयेत.-जयंत साहेबराव पाटील, जळगाव 

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव