शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील ४५ शिक्षकांनी दिली चुकीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 13:23 IST

जिल्हा परिषदेच्या आॅनलाईन बदलीसाठी तब्बल ४५ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी माहिती न आल्याने तसेच चाळीसगाव गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने दोघांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्दे३४ शिक्षकांची उच्च न्यायालयात धावचाळीसगाव व जामनेरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीसजिल्हाभरातील ५५० विस्थापित शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत

जळगाव : जिल्हा परिषदेच्या आॅनलाईन बदलीसाठी तब्बल ४५ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी माहिती न आल्याने तसेच चाळीसगाव गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने दोघांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दोन्ही तालुक्याची माहिती गुरुवारपर्यंत सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सर्व गटशिक्षणाधिकाºयांची बैठक बुधवारी दुपारी १२ वाजता झाली. शिक्षणाधिकारी पाटील यांनी प्राथमिक शिक्षकांच्या करण्यात आलेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये चुकीची माहिती सादर करणाºया शिक्षकांचा तालुकानिहाय व संवर्गनिहाय आढावा घेतला. ज्या शिक्षकांचे वय ५३ वर्षांच्या वर आहेत, दुर्धर आजाराने त्रस्त आहेत, अंध व अपंग आहेत, अशा ९ शिक्षकांनी संवर्ग एक नुसार चुकीची माहिती भरली आहे. पतीपत्नी एकत्रिकरणासाठी अंतर जास्त दाखवून लाभ घेणाºया संवर्ग २ मध्ये २२ शिक्षकांनी चुकीची माहिती भरली आहे. तर अन्य संवर्गानुसार १४ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे.प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रकरणी संवर्गनिहाय माहिती घेऊन बैठकीसाठी उपस्थित राहण्याबाबत मंगळवारी शिक्षण विभागाकडून पत्र देण्यात आले होते. त्यानुसार सर्वच गटशिक्षणाधिकाºयांनी चौकशी करीत माहिती सोबत आणली. मात्र जामनेर गटशिक्षणाधिकाºयांनी सोबत माहिती न आल्याने शिक्षणाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करीत त्यांना सुनावले.काय आहेत शिक्षक बदलीमधील घोळजिल्हा परिषदेच्या १८०० शाळांमध्ये ६ हजार शिक्षक कार्यरत आहे. त्यातील ९० टक्के शिक्षकांच्या बदली करणात आली. यावर्षी प्रथमच आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. ३० मे पर्यंत ही बदली प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ६ जून उजाडल्यानंतरही घोळ कायम आहे. जिल्हाभरातील ५५० विस्थापित शिक्षकांना अजूनही नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. तर काही शिक्षकांनी चुकीची माहिती भरून सोयीचे ठिकाण मिळविले होते. याविरोधात काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.३४ शिक्षकांची उच्च न्यायालयात धावजिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलेल्या आॅनलाईन बदलीमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार करीत जिल्हाभरातील ३४ शिक्षकांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारपर्यंत ३४ याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. अन्याय झालेल्या आणखी काही शिक्षकांकडून याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावzp schoolजिल्हा परिषद शाळा