शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

यात्रेत दुकान मांडण्याआधीच काळाने घातला घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 13:11 IST

पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर तुराटखेडे गावालगत पिकअप व टँकरची जोरदार धडक झाल्याने या अपघातात दोन ठार ...

पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर तुराटखेडे गावालगत पिकअप व टँकरची जोरदार धडक झाल्याने या अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना २२ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यातील मयत दोघेही एका यात्रेतून दुसऱ्या यात्रेत कटलरी साहित्याचे दुकान मांडण्यासाठी जात होते. मात्र, तिथे पोहचण्याआधीच त्यांच्यावर हा अनर्थ ओढवला.जळगाव येथील मासुमवाडी येथील रहीवासी शेख इक्बाल शेख ताहिर (वय २८), शेख आलताफ शेख वाहब (३२) हे दोघे चुलतभाऊ व त्यांच्यासोबत चालक वसिम पटेल (३०) हे तीन जण पिकअप वाहन (एमएच १५ ईव्ही २३८१)ने माहेजी येथून यात्रा आटोपून धुळे येथील रामबोरीस यात्रेत व्यवसायासाठी जात होते. राष्ट्रीय महामार्ग सहावर धुळ््याकडून येणारा टँकर (एमएच ४८, जे ५२२) हा पिकअप वाहनास जोराने धडकला. या अपघातात शेख इक्बाल, शेख अल्ताफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर टँकर चालक महेंद्र यादव (उत्तर प्रदेश) व पिकअप चालक वसिम पटेल (जळगाव) हे दोघ जखमी झाले आहेत.घटनेची माहिती कळताच रुगणवाहिका चालक ईश्वर ठाकुर, मुकेश ठाकुर यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी मदत करीत अपघातातून मयतांना बाहेर काढले.कुटीर रुग्णालयात जखमी महेंद्र यादववर डॉ.योगेश साळुंखे व प्रशांत सोनवणे, डॉ.सुनिल पारोचे यांनी उपचार केले. सायंकाळी दोघांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात दिले. पारोळा पोलीस ठाण्यात मोहम्मद रफिक शेख शफी यांच्या फिर्यादीवरून टँकरचालक महेंद्र यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.यात्रेत कटलरी साहित्य विकून करायचे उदरनिर्वाहमूळ मासुमवाडी (जळगाव) येथील हे दोघे चुलत भाऊ कटलरीचे व पोळपाट, लाटणे विक्रीचे साहित्य आपल्या वाहनात घेऊन चालक वसीम पटेलसह खान्देशात जिथे जिथे यात्रा असेल त्या ठिकाणी दुकान लावत. या महिन्यात ६ यात्रा करून ते पाचोरा तालुक्यातील माहिजीची यात्रा आटोपून धुळे तालुक्यातील राम बोरीस यात्रेसाठी निघाले होते. पण त्या आधीच त्यांचा दुर्दैवाने अपघातात मृत्यू झाला. ते दोघेही गरीब कुटुंबातील होते. अपघातानंतर वाहनातील साहित्य रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत पडलेले होते.इकबालचे दीड वर्षापूर्वीच झाले होते लग्न... या अपघातात ठार झालेले अल्ताफ शेख वहाब मन्यार (वय ३२) व शेख इकबाल शेख ताहेर मन्यार (वय २७) दोन्ही एकमेकांचे नातेवाईक असून कासमवाडीला लागून असलेल्या हाजी अहमद नगरातील रहिवाशी होते. अल्ताफ याच्या पश्चातआई, वडील, पत्नी रहिनाबी, मुलगी सुफीया, फातिमा व मुलगा रेहान तर इकबाल याचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते.आई, वडील, पत्नी रेहानबी व चार भाऊ आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव