शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोवर, रुबेलाने वाढविली पालकांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:58 IST

लहान मुलांना इंजेक्शनची भीती

विजयकुमार सैतवालजळगाव : राष्ट्रीय कार्यक्रम असलेल्या गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेने लहान मुलांना इंजेक्शनची भीती असल्याने ते शाळेत जाण्यासाठी मागे-पुढे करीत आहे. या सोबतच या लसीकरणाच्या दुष्परिणामांबाबत वेगवेगळे संदेश फिरत असल्याने पालकांचीही चिंता वाढली आहे.मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेचे जळगाव जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ८ लाख ५७ हजार ८४८ लाभार्थी असून त्यांना पाच आठवड्यात लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील या लाभार्थींप्ांैकी ६४ ते ६४ टक्के लाभार्थी हे शालेय विद्यार्थी असून त्यांना शाळेतच लसीकरण केले जाणार आहे. तसेच उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण अंगणवाडी केंद्र व बाहय लसीकरण सत्रात केले जाणार आहे.राज्यात काही ठिकाणी या लसीकरण मोहिमेसाठी पालकांकडून संमतीपत्र मागितले जात असल्याच्या तक्रारी होत्या. या मुळे पालकांमध्ये अधिक चिंता आहे. शाळांकडून संमतीपत्र मागितले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यासाठी संमतीपत्राची आवश्यकता नसल्याचेही आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.जळगाव जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांपैकी ६० ते ६५ टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे आहेत. त्यांना लस देण्यासाठी ३ हजार ३८० शाळांमध्ये एकूण ४३६६ लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थी शाळाबाह्य असून नंतरच्या २ आठवडयात अंगणवाडी केंद्र व बाह्य लसीकरणाचे ३०३३ सत्र, दुर्गम अति जोखमीचा भागामध्ये एकूण १३५ सत्र व २४८३ संस्थेतील सत्र असे एकूण जिल्ह्यातील १० हजार १७ सत्रामध्ये गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे.गोवर रुबेला लसीकरणाबाबत भीती असली तरी या मोहिमेचा लाभ सर्व नागरिकांनी घेऊन आपल्या ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुला व मुलींना गोवर रुबेलाची लस द्यावी, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.गोवर-रुबेला लसीकरणाबाबत पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने ते बालरोग तज्ज्ञांकडे विचारणा करीत आहेत. अनेक पालकांनी याबाबत संमती दर्शविली असली तरी मुलांना लस दिली असल्याने पुन्हा द्यावी की नाही, या बाबत संभ्रमात आहेत. त्यात सोशल मीडियावर असणाºया वेगवेगळ््या संदेशांमुळे पालक भयभीत होत असल्याचे सांगितले जात आहे. हे लसीकरण केल्यानंतर कोणत्याही लसीकरणानंतर येणारा ताप येऊ शकतो अथवा पूरळ येऊ शकतात. मात्र पालकांनी त्याबाबत भीती बाळगू नये, असे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे. ताप आल्यास औषधी देऊन तो कमी होऊ शकतो व पूरळ आल्यास त्यासाठी औषधोपचाराची आवश्यकता नसल्याचे बालरोग तज्ज्ञांचेही म्हणणे आहे

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव