शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

२५०० किलो भरीत बनविण्याचा जळगावात होणार विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:02 IST

शेफ विष्णु मनोहर यांची माहिती

ठळक मुद्दे२१ डिसेंबर रोजी बनविणार भरीत४००० किलो पेलणारी चुल

जळगाव : खान्देशी वाग्यांचे भरीत जगप्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर हे २१ डिसेंबर रोजी जळगावातील सागर पार्क मैदानावर मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने २५०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रम करणार आहे. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक्स आॅफ वर्ल्डमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे.या उपक्रमाची माहिती खुद्द सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी सोमवारी जळगावात पत्रपरिषदेत दिली.भरीत बनविण्यासाठी कोल्हापुरात तयार होतेय कढईते म्हणाले की, यावल तालुक्यातील बामणोद येथे भरीताच्या वाग्यांची शेती पाहून गेल्या वर्षीपासून खान्देशी भरीताला जगप्रसिध्द करण्यासाठी तयारी सुरू केली. २५०० किलो भरीत बनविण्यासाठी सागर पार्क हे ठिकाण निश्चित करण्यात आले. पाच ते सहा हजार नागरिक हा विक्रम बघू शकणार आहेत. भरीत बनविण्यासाठी कोल्हापूर येथे ४५० किलो वजनाची कढई तयार केली जात आहे़ ती १० बाय १० फुटाची असणार असून तीन फुट खोल असेल़ तिला चुलीवर ठेवण्यासाठी क्रेनची मदत घेणार आहे. जगात कुठेही भरीताचा विक्रम झालेला नाही. पुण्यात त्यासाठी सराव सुरु आहे.आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांच्या कार्यालयात मराठी प्रतिष्ठानतर्फे झालेल्या पत्रपरिषदेला प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड़ जमिल देशपांडे, सचिव विजयकुमार वाणी, निलोफर देशपांडे, अनुराधा रावेरकर, संध्या वाणी आदी उपस्थित होते़भरीत बनविण्यासाठी लागणारा सराटा ११ फुट लांब असणार आहे़ गिनीज बुक्स आॅफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार भरीत बनविताना कुठल्याही यंत्राचा वापर होणार नाही़ ही प्रक्रिया करत असताना कढईजवळ स्वत: मी आणि देवराम भोळे व दत्तु चौधरी यांच्यापैकी एक जण सोबत असणार असल्याचे मनोहर यांनी सांगितले़ पहाटे ५ वाजेपासून भरीताचे वांगे भाजण्याला सुरूवात होईल़ पारंपरिक पध्दतीने ही संपूर्ण प्रक्रिया केली जाणार आहे़ २० डिसेंबर रोजीच बामणोद येथून वांगे आणली जाणार आहेत.विक्रमासाठी ३२०० किलो वांगे, १२० किलो तेलसामग्री आधीच मैदानावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मराठी प्रतिष्ठानचे अ‍ॅड़ जमिल देशपांडे यांनी सांगितले़ या संपूर्ण उपक्रमासाठी ६० महिला, ४० पुरूष तसेच २० सुपरवायझर, २ मुख्यनिरीक्षक असे मनुष्यबळ असणार आहे़४००० किलो पेलणारी चुलभरीत बनविण्यासाठी ४००० किलो वजन पेलणारी चुल तयार करण्यात येणार आहे़ दोन दिवस चालणाऱ्या या प्रक्रियेचे संपूर्ण व्हीडीओ केले जाणार आहेत, अन् विश्वविक्रमात नोंद घेण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. शेफ विष्णू मनोहर यांची आकाशवाणी चौकातून २१ डिसेंबरला ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव