यावेळी प्रथमच सामाजिक एकतेचे दर्शन घडले. वीर एकलव्य संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आपली उपस्थिती दर्शविली होती. यावेळी प्रथम सकाळी वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दुपारी २ वाजता मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांचीदेखील लक्षवेधी गर्दी होती. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तान्हाजी वाघ, आमदार मंगेश चव्हाण, दीपक ठाकरे, सरपंच कमळाबाई माळी, जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील, उपसरपंच गोकुळ महाजन, धर्मा काळे, अमोल चव्हाण, दिनेश महाजन, पोलीस पाटील आबा शिंदे, रमेश माळी, मंगेश रावते उपस्थित होते.
यावेळी महेंद्र सोनवणे, समाधान मोरे, किशोर पवार, संजय सोनवणे, अशोक सोनवणे, अशोक दळवी, नामदेव माळी, भरत गायकवाड, हिरामण पवार, समाधान सोनवणे, दीपक ठाकरे, आनंदा सोनवणे, भिकन सोनवणे, सोमनाथ दळवी, आधार दळवी, राजाराम मोरे, राजेंद्र सोनवणे, किरण दळवी, बबलू सोनवणे, श्रावण पवार, नाना मोरे, सोनू दळवी, योगेश सोनवणे यांनी परिश्रम घेतले.