आनंद सुरवाडे जळगाव : संकट आले होते धावून... मात्र रडल्या नाही...पडल्या नाही़़़अडखळल्या नाही़़़ मानसिक बळावर लढल्या...कर्करोग नामक राक्षसाशी थेट भिडल्या़़अशा ‘आम्ही मैत्रिणी’ अन् इतरांना कर्करोगापासून वाचविणारी अशी ही मैत्री़़़ कर्करोगातून बऱ्या झालेल्या जळगावातील दोघींनी सुरू केलेल्या या चळवळीला बारा वर्षात व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे़़ ३५० रूग्णांना दिलासा़़ शेकडो रूग्णांमध्ये जागृती़़़ असे यांचे प्रेरणादायी कार्य वाढतच आहे़़़ जळगावातील रेवती ठिपसे यांना कर्करोगाचे निदान झाले होते़ त्यातून त्या सुखरूप बाहेर पडल्या. त्यानंतर अशाच प्रकारे कर्करोगाशी लढा दिलेल्या डॉ़ उषा शर्मा यांच्याशी त्यांनी संपर्क साधला़ आपल्या वाट्याला आलेले दु:ख इतरांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी त्यांनी कर्करोगासंबंधी जनजागृती सुरू केली.त्यांची ही आदर्श अशी सामाजिक चळवळ ७ एप्रिल २००८ रोजी सुरू झाली व आम्ही मैत्रीणी हा ग्रुप स्थापन झाला़ आज या ग्रुपचे कार्य वाढून तो ३२ सदस्यांचा झाला आहे. यात डॉ. तिल्लोत्तमा गाजरे, डॉ. श्रध्दा चांडक व आहारतज्ज्ञ डॉ. मृदूला कुलकर्णी यांचा समावेश आहे.या ग्रुपच्या माध्यमातून कर्करोगग्रस्तांना आधारही दिला जातो व शक्य तिथे आर्थिक मदतही केली जाते़़़ शाळा, एनसीसी कॅम्पव्दारे तसेच घरोघरी जावून अशा प्रकारे या ग्रुपचे जनजागृतीचे काम नियमित सुरू आहे.-रेवती ठिपसे, जळगाव.
३२ जणींचा हातात हात़़ कर्करोगग्रस्तांना साथआदर्श कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 11:50 IST