शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

खडसे-महाजन वादात कार्यकर्त्यांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 12:51 IST

ओबीसींचा मुद्दा घेऊन फडणवीसांविरोधात आघाडी उघडण्याचा खडसे यांचा प्रयत्न; समर्थनाविषयी उत्सुकता, रोहिणी खडसेंसोबतच हरिभाऊ जावळे, शिरीष चौधरी यांच्या पराभवाविषयी मंथन होणार काय ?

मिलिंद कुलकर्णीकेंद्र व राज्यात सरकार असतानाही भाजपला बहुमत तर सोडा, पण गेल्यावेळेची कामगिरीदेखील करता आली नाही. पाच वर्षे शिवसेनेसोबत सत्ता राबवित असताना युतीला बहुमत मिळूनही सेनेशी संवाद साधण्यात अपयश आले. अजित पवारांसोबतच औटघटकेचे राज्य हा तर कळसाध्याय ठरला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची क्षमता आणि मर्यादा या महिना-दीड महिन्यात स्पष्ट झाली. ‘हीच ती वेळ’ असे म्हणत एकनाथराव खडसे यांनी ‘ओबीसी’चा मुद्दा तापवायला सुरुवात केली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेतृत्वाला त्यातून आव्हान दिले गेले आहे.महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर भाजपला चौफेर टीकेचा सामना करावा लागत आहे. त्यात भर म्हणजे पंकजा मुंडे, एकनाथराव खडसे या असंतुष्ट नेत्यांनी उघडलेल्या आघाडीमुळे पक्षनेतृत्व पेचात सापडले आहे. अर्थात मोदी-शहा या पक्षनेतृत्वाने अशी संकटे आणि आव्हाने पार करीत भाजपवर पकड मजबूत केली असल्याने ते हे बंड कसे हाताळतात, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.खडसे यांची नाराजी ही मंत्रिमंडळाबाहेर पडल्यापासून आहे. त्यात नवीन काही नाही. परंतु, त्यांनी टायमिंग अचूक साधले आहे. २२० च्या पार असा नारा देणाऱ्या भाजपचा अश्वमेध १०५ वर अडकला. महाजनादेश मिळूनही सेनेची ‘मन की बात’ फडणवीस यांना कळली नाही. अजित पवार यांच्यासोबत जाऊन स्वत:चे हसे करुन घेण्यापर्यंत फडणवीस यांची लोकप्रियता घसरली. ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेच्या विडंबनाने विनोदाचे विक्रम मोडले. मोदी आणि शहा यांचा पाठिंबा असलेल्या फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा आणि क्षमता या काळात उघड झाल्या. बावनकुळे, खडसे, तावडे, मुंडे या बहुजन नेत्यांना डावलण्याचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत फडणवीस यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे नेतेदेखील होते, पण अग्रस्थानी फडणवीस असल्याने सामान्य कार्यकर्त्यांच्या रोषाचे ते धनी ठरत आहेत. फडणवीसांविषयी असलेल्या रोषाची तमा न बाळगता पक्षनेतृत्वाने त्यांना विरोधी पक्षनेत्याची संधी दिल्याने भाजपमधील असंतुष्ट अस्वस्थ झाले आहेत. त्यातून फडणवीसांविरुध्द ही मोहिम बीड, जळगावमधून सुरु झाली आहे.पंकजा मुंडे, रोहिणी खडसे यांच्या पराभवाचा मुद्दा चर्चेत आला, कारण त्या मातब्बर नेत्यांच्या मुली आहेत. पण पक्षांतर्गंत वादाचा फटका बसलेल्या हरिभाऊ जावळे, शिरीष चौधरी यांच्यासारख्या विद्यमान आमदारांच्या पराभवाविषयी चर्चा होणार की नाही? आणि ती कोण करणार? प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी घेतलेल्या चिंतन बैठका या केवळ उपचार ठरणार आहेत का, हा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.खडसे आणि महाजन यांच्यातील नेतृत्वाच्या वादातून सामान्य कार्यकर्त्याची कोंडी होत आहे. एकीकडे महाविकास आघाडी एकसंघपणे भाजप नेतृत्वाखालील जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महापालिकांमध्ये आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. नव्या सरकारने विकास कामांना दिलेल्या स्थगितीमुळे पदाधिकारी कोंडीत सापडले आहेत. त्यांना मार्गदर्शन आणि मदतीचा हात देण्याऐवजी पक्षनेते एकमेकांची उणीदुणी काढण्यात मग्न झाल्याने भाजपची अवस्था ‘काँग्रेस’ प्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही, ही कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे.भाजपला राज्यातील सत्ता पुन्हा राखता येत नाही, हे १९९९ नंतर २०१९ ला पुन्हा दिसून आले. तेव्हा महाजन-मुंडे यांचे नेतृत्व होते. यंदा फडणवीस यांना पक्षनेतृत्वाचा पाठिंबा होता. याच काळात खडसे यांच्यावर आरोप झाले आणि मंत्रिमंडळाबाहेर पडावे लागले. अशी कारवाई झालेले ते एकमेव मंत्री होते. शेवटी शेवटी काहींना वगळले तर काही मंत्र्यांना तिकीट दिले गेले नाही. अशा असंतुष्टांची मोट बांधण्याचा खडसे यांचा प्रयत्न दिसतोे. त्यांच्या या दबावतंत्रापुढे नेतृत्व झुकते काय हे बघायला हवे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव