शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सुख-दु:खाची ऊन-सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 13:15 IST

संमिश्र प्रसंगांची मोठी रांग

१० एप्रिल १९०८ साल. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर गुलाबला मुलगी झाली. मुलीचे नाव ठेवले रामी. आपल्याला नात झाल्याचा विशेष आनंद कस्तुरबाने साजरा केला. आपल्या नातलग बायकांच्या मदतीने बाळंतपण सुखरूप पार पाडले. चारच दिवसांनंतर गोकूळदास या भाच्याचे निधन झाले. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. तो फिनिक्सला येणार होता. सारे संपले होते. कस्तुरबाला गोकूळदासच्या आठवणींनी बेजार केले. एकीकडे नातीच्या जन्माचा उत्सव तर दुसरीकडे भाच्याच्या निधनाचे दु:ख तिच्या वाटेला. अशा संमिश्र प्रसंगांची मोठी रांग सदा न् कदा असायची. एकीकडे उसळता आगडोंब असायचा तर दुसरीकडे झगमगता सण.गांधीजी तुरुंगात होते. अल्बर्ट वेस्टने एका तारेने कस्तुरबाच्या तब्येतीबद्दल त्यांना कळवले होते. तिला रुग्णालयात हलवावे लागेल, असे त्याचे मत होते. यासाठी गांधीजींनीे लवकर तुरुंगातून सुटका करून घ्यावी. माघारी परतावे, असा त्याने सल्ला दिला. हे पत्र वाचून गांधीजींनी उत्तरादाखल ९ नोव्हेंबर १९०८ रोजी लिहिले-‘प्रिय कस्तूर,तुझ्या तब्येतीविषयी वेस्ट यांनी पाठवलेली तार पोहोचली. माझे हृदय विदिर्ण झाले. तुझी सेवा करायला माझे मन धाव घेत आहे. परिस्थिती मात्र अनुकूल नाही. सत्याग्रहाच्या लढ्यात मी सारे काही अर्पण केलेले आहे. मी नाही तिकडे येऊ शकत. दंड भरल्यावर खरे तर मला तिथे येता येईल पण दंड तर मी भरणार नाही. तू जरा हिंमत धर. योग्य आणि नियमित आहार घे. तू बरी होशील आणि माझ्या दुर्दैवाने तू जर मरण पावणार असशील तर माझ्या हयातीत तुझे असे निघून जाणे काही वाईट नाही.माझे तुजवर इतके प्रेम आहे की, तू निघून गेल्यावर माझ्यासाठी जिवंत राहशील. तुझा आत्मा तर अमर आहे. मी तुला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की, तुला जावे लागले तर मी दुसरा विवाह करणार नाही. मी तुला अनेकदा समजावून सांगितले आहे की, तू ईश्वरावर आस्था ठेवून जीव सोडावास. तुझे बलिदान सत्याग्रहासाठी असेल. माझा लढा काही केवळ राजकीय स्वरूपाचा नाही. तो धार्मिक स्वरूपाचा आहे. यामुळे अतिशय स्वच्छ आहे. यात जीवन काय आणि मरण काय? दोघेही सारखे. तुही असे जाणे. मनाला वाईट वाटून घेऊ नकोस, अशी मी उमेद करतो, असे मागणे मागतो.’- प्रा.डॉ. विश्वास पाटील