शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

निरुपयोगी शेतमालातून लाकडी विटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 21:14 IST

कासोदा येथील तरुणाने कापूस वेचून रिकाम्या झालेल्या झाडांपासून कुट्टी करून प्रदूषण विरहित ब्रिकेट (बायोकोल) अर्थात लाकडी विटा बनवण्याचे काम सुरू केले आहे.

ठळक मुद्देया ब्रिकेट बॉयलरसाठी वापरण्यात येतात कासोदा येथील तरुणाचा अभिनव उपक्रम ५० मजुरांना रोजगार देणारा ‘मेक इंन इंडिया’

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथील तरुणाने कापूस वेचून रिकाम्या झालेल्या झाडांपासून कुट्टी करून प्रदूषण विरहित ब्रिकेट (बायोकोल) अर्थात लाकडी विटा बनवण्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांची कपाशीची झाडे उपटण्याची मजुरी तर वाचतेच, पण दररोज ४० ते ५० मजुरांना यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. सरकारचे ‘मेक इंन इंडिया’ यशस्वी होईल तेव्हा होईल पण आज या तरुणाने हा नवा व्यवसाय सुरू करून दगडी कोळशाला मोठा पर्याय स्वस्तात उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या तरुणाचे कौतुक होत आहे.सध्या पावसाळा संपून कापूस वेचणी संपली आहे. कापसाची झाडे उपटून शेत रब्बीसाठी तयार करण्याची कामे जोरात सुरू आहेत. पण येथील समाधान शांताराम चौधरी या तरुणाने कपाशीच्या हिरव्या झाडांपासून ब्रिकेट बनवण्यासाठी एक छोटासा उद्योग सुरू केला आहे. टॅÑक्टरसोबत एक कुट्टी करण्याचे मशीन घेऊन सुमारे २० ते २५ मजूर घेऊन कापसाची झाडं असलेल्या शेतात जातो. तेथील सर्व झाडे (पºहाट्या) उपटून तेथे कुट्टी करण्यात येते. ही कुट्टी ब्रिकेट बनवण्याच्या कारखान्यात आणली जाते. त्यानंतर या कारखान्यात ब्रिकेट बनवल्या जातात. या ब्रिकेट बॉयलरसाठी वापरण्यात येतात. मोठमोठ्या कारखान्यात जेथे दगडी कोळसा वापरला जातो त्याला या ब्रिकेट पर्याय म्हणून वापरल्या जाऊ लागल्या आहेत. या ब्रिकेटचे वैशिष्ट्य असे की या ब्रिकेटपासून अजिबात प्रदूषण होत नाही. दगडी कोळसा दहा हजार रुपये टन विकला जातो. तर या ब्रिकेट पाच हजार रुपये टन विकल्या जातात. त्यामुळे यांना मोठी मागणी असते.सुमारे २ लाख खर्चाचे कुट्टी मशीन व ५ लाख रुपयांचे ट्रॅक्टर व ब्रिकेट बनवण्यासाठी उभारण्यात येणारा २० लाख रुपये खर्चाचा छोटा कारखाना, अशा सुमारे २५ ते ३० लाख रुपये भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो. तालुक्यात अशी अभिनव कल्पना या तरुणाला सुचली व त्याने हे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. सुमारे सहा हजार चौरस फूट जागेतच ५० मजुरांना पोटापाण्यासाठी हा उद्योग सुरू झाला आहे. यात शेतातील पºहाट्या उपटण्याची मजुरी वाचत असल्याने शेतकरीदेखील खूश आहेत.फक्त कापसाचे झाडेच नाहीत, तर मक्याचे भुट्टे, तुरीच्या काड्या, सोयाबीन, हरभरा या पिकांचे वेस्टेज मटेरियल आम्ही स्वखर्चाने उचलून घेऊन जातो. त्यापासून ब्रिकेट बनवतो. शेतकऱ्यांची मजुरी वाचते, म्हणून आम्हाला सर्वच शेतकºयांकडून निरोप येत असतात.-समाधान शांताराम चौधरी, कासोदा 

टॅग्स :FarmerशेतकरीErandolएरंडोल