शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

सोशल मीडियाच्या माध्यमातून सावित्रीच्या लेकींद्वारे महिलांचा व्यक्तीमत्त्व विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:50 IST

वुमेनिया हॅपी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

ठळक मुद्दे महिलांना उपलब्ध करुन दिले हक्काचे व्यासपीठव्यक्तीमत्त्व विकास व उद्योजकतेला वाव

विकास पाटील / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ - सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचा व्यक्तीमत्त्व विकास व उद्योजकतेला वाव देण्याचे कार्य जळगावात सावित्रीच्या लेकींनी हाती घेतले आहे. जात, पात, धर्माचे कोणतेही बंधन न ठेवता फक्त महिलांचा विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत ‘वुमेनिया हॅपी’ ग्रुपच्या माध्यामातून कार्य सुरु केले आहे. समाज माध्यमांचा कसा प्रभावी वापर होऊ शकतो, हे या ग्रुपने सिद्ध केले आहे.ना अध्यक्ष ना सचिव...कोणतेही मंडळ, संस्था म्हटले म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांची कार्यकारिणी असतेच. कोणतेही कार्य करण्यासाठी पैसा लागतोच, त्यामुळे वर्गणीही गोळा केली जाते. जात, पात, धर्मानुसार या संस्था व मंडळ असतात. मात्र या सर्व बाबींना वुमेनिया हॅपी ग्रुप अपवाद आहे. कोणतीही कार्यकारिणी व अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड न करता महिलांचा विकास या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत आहे.सुना आल्या एकत्रमहिलांना खूप काही करण्याची इच्छा असते. कुणाला घरात बसून व्यवसाय करायचा असतो तर कुणाला पाककृती, शेअर मार्केट अशा प्रकारे विविध प्रकारची माहिती आपल्या आवडीनुसार हवी असते. ती माहिती मिळावी यासाठी विवाहनंतर जळगावात सासरी आलेल्या काही सुना एकत्र आल्या. त्यांनी वुमेनिया हॅपी ग्रुप नावाचे फेसबुक तयार केले व त्याद्वारे महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ६ नोव्हेंबर २०१७ मध्ये हे पेज तयार करण्यात आले. त्याद्वारे हवी ती माहिती महिलांना देण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे ही माहिती देण्यासाठी कोणतीही फी अथवा वर्गणी गोळा करण्यात येत नाही. सर्वकाहीमोफतआहे.महिलांना मिळेत अवघ्या काही मिनिटात हवी ती माहितीप्रत्येकाच्या हातात मोबाईल आला मात्र व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इस्टाग्राम या समाज माध्यमांचा वापर कसा करावा, याबाबत महिलांना पुरेशी माहिती नसते, याबाबतही त्यांना माहिती मिळावी यासाठी तसेच योगा, शेअर मार्केट, पाककला कृती, आरोग्य, बँकींग, नेट बँकींग तसेच सौंदर्याबाबत तसेच मनोरंजनाची माहिती महिलांना दिली जात आहे. सोशल मीडियाचा कसा वापर करावा याबाबतही लवकरच कार्यशाळाही घेण्यात येणार असल्याचे या ग्रुपच्या सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.फेसबुवरच महिलांसाठी स्पर्धाफेसबुवकरच महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात व निकालही जाहीर करण्यात येतो. या उपक्रमात महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात.आठवडाभर दररोज एक कार्यक्रममहिलांना हवी ती माहिती मिळावी तसेच मनोरंजनासाठी आठवडाभर दररोज एक कार्यक्रम घेतला जातो. सोमवारी महिलांना प्रोत्साहन, मंगळवारी पाक कला कृती, बुधवारी व शनिवारी मार्केट, गुरुवारी सौंदर्याबाबत, शुक्रवारी व्हॅकी फ्रायडे असतो, रविवारी मनोरंजन अशा प्रकारे आठवडाभर कार्यक्रम होत असतात. त्यात महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याचे सी.ए. पूजा मुंदडा व तनीशा अडवाणी यांनी सांगितले.व्यक्तीमत्त्व विकास व उद्योजकतेला वावमहिलांच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी व उद्योजकतेला वाव मिळावा यासाठी सी.ए. पूजा मुंदडा, तनीशा अडवाणी, सुलेखा लुंकड, मीनल जैन, रश्मी एन. रेदासनी, मोना बिर्ला, कांचन मुंदडा, निकिता नितीन रेदासनी, रिझू रेदासनी या सावित्रीच्या लेकी मेहनत घेत आहेत. ग्रुपच्या कार्याबाबतची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

टॅग्स :JalgaonजळगावWomenमहिला