शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना कमी होईना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 12:47 IST

वर्षभरात ७२३ घटना

ठळक मुद्देबालगुन्हेगारांकडून अत्याचार अधिकप्रत्येक जिल्ह्यात ‘वन स्टॉप सेंटर’ उघडणार

६७ महिलांवर बलात्कार, १६ खूनसुनील पाटील / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ -महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र त्यानंतरही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात २०१७ मध्ये महिला अत्याचाराच्या ७२३ घटना घडल्या आहेत. त्यात ६७ महिलांवर बलात्कार झालेला असून, १६ महिलांचे खून झालेले आहेत. लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कळमसरे व दोंडाईचा येथील प्रकरण ताजे आहे.महिलांना आरक्षण, सर्व क्षेत्रात महिलांना प्राधान्य, मुलगी शिकली प्रगती झाली, ‘यशस्वी पुरुषामागे स्त्री’ अशा गोड शब्दांची रोज उधळण होत असली तरी, समाजात महिलांची होणारी हेळसांड थांबलेली नाही. उलट महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. कार्यालय, शाळा-महाविद्यालय, बस-रेल्वे प्रवास आणि इतर ठिकाणीही महिलांना कोणत्या ना कोणत्या घटनेला रोज सामोरे जावे लागते.या गुन्ह्यांची नोंदही पोलीस ठाण्यात केली जाते. पुढे प्रकरण न्यायालयात जाते. मात्र तिथूनही प्रकरणे लवकर पुढे सरकत नाहीत. साहजिकच इथेही या महिलांची हेळसांड होते.बालगुन्हेगारांकडून अत्याचार अधिकराष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या नोंदणीनुसार २०१३ मध्ये महिलांवर अत्याचार वाढले आहेत. बालगुन्हेगारांकडून हे अत्याचार करण्याचे प्रमाण १३२ टक्क्यांनी वाढले आहे.१६ ते १८ वयोगटातील मुलांकडून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. २००२ मध्ये हे प्रमाण ४८.७ टक्के होते. ते २०१३ मध्ये ६६.३ टक्के झाले आहे.देशात महाराष्टÑ आघाडीवरमहिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात दोन वर्षांपूर्वी सुमारे १३ हजार ८२७ तक्रारींची नोंद झाली. त्याखालोखाल मध्य प्रदेशमध्ये १३ हजार ३२३ आणि आंध्र प्रदेशात १३ हजार २६७ तक्रारी दाखल झाल्या. देशातील इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात नोंदवण्यात आलेल्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.प्रत्येक जिल्ह्यात ‘वन स्टॉप सेंटर’ उघडणारअत्याचार झालेल्या महिलांना मदत मिळण्यासाठी वन स्टॉप सेंटर उघडण्यात येणार आहे. देशातील ६६० ठिकाणी आणि प्रत्येक जिल्ह्यात हे केंद्र उघडले जाईल. हे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. या केंद्र्रात वैद्यकीय मदत, पोलीस साहाय्यता, कायदेशीर सल्ला, मानस-सामाजिक सल्ला आणि तात्पुरता निवारा आदी बाबी असणार आहेत. केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव