शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

संपादीत जमिनीचा पुरेसा मोबदला मिळत नसल्याने महिलेने केले विषप्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:18 IST

चाळीसगाव तालुक्यातील सौर प्रकल्पस्थळीच घेतले विष

ठळक मुद्दे खळबळजनक घटनामहिलेवर चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १७ - सौर प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा पुरेसा मोबदला मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नीलाबाई एकनाथ राठोड (५५, रा. बोढरे, ता. चाळीसगाव) या महिलेने सौर प्रकल्पस्थळीच विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बोढरे शिवारात घडली.खान्देशातील विखरण, जि. जळगाव येथील धर्मा पाटील या शेतकºयाने थेट मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न व त्यानंतर त्यांचा झालेला मृत्यू ही घटना ताजी असतानाच पुन्हा जळगाव जिल्ह्यातील बोढरे (ता. चाळीसगाव) शिवारात अशीच घटना घडली आहे.नीलाबाई राठोड यांची २१ एकर जमीन सौर प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आली आहे. त्यापोटी त्यांना ४ लाख ८० हजार रुपयांचा मोबदला मिळाला आहे. मात्र वाढीव व उर्वरित मोबदल्यासाठी त्यांच्या चकरा सुरू आहे. तरीही तो मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नीलाबाई यांनी शनिवारी सकाळी प्रकल्प स्थळीच विष प्राशन केले. या मुळे मोठी खळबळ उडाली असून महिलेवर चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावSuicideआत्महत्या