शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी पालटवले लोण पिराचे गावाचे रुपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:49 IST

लोण पिराच,े ता.भडगाव या ग्रामपंचायतीवर महिलाराज विराजमान झाले नि गावाचे रुपडंच बदलले.

ठळक मुद्देमहिाल दिन विशेषग्रामपंचायतीवर महिला राज अन् गावाची सर्वच बाबींत एकी

प्रमोद ललवाणी ।कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : लोण पिराच,े ता.भडगाव या ग्रामपंचायतीवर महिलाराज विराजमान झाले नि गावाचे रुपडंच बदलले. यासाठी सरपंच चंदना विजय पाटील यांनी महिला सदस्यांना सोबत घेत स्मार्ट ग्राम करत तालुक्यातील स्मार्ट ग्रामचे पहिले १० लाखांचे बक्षीस मिळवत आदर्श, सुंदर, स्वच्छ गाव बनविण्यासाठी या महिलांची कामगिरी येथे उल्लेखनीय ठरली. स्मार्ट ग्राम पाठोपाठ इतरही बक्षीस या गावास मिळाली आहेत.लोण पिराचे ग्रामपंचायतीवर सन २०१५ च्या निवडणुकीत प्रथमच महिलांच्या हाती सरपंच चंदना पाटील यांच्यासह इतर सहा महिलांनी हाती सत्ता घेताच गाव स्वच्छ, सुंदर व ग्रामपंचायत पेपरलेस करावी, पाणी प्रश्न सुरळीत करण्याबरोबरच ग्रामपंचायतीमार्फत नाममात्र शुल्कात आरओचे ग्रामस्थांना दिले पाहिजे हे उद्दिष्ट समोर ठेवत त्यांनी गावाची सूत्रे हाती घेतली. गावात नवनवीन उपक्रम राबवित गाव सुंदर स्वच्छ बनविण्याचा संकल्पच केला नि प्रत्येक कामात हे महिलाराज यशस्वी झाले. ‘लोकमत’तर्फेदेखील वीज व्यवस्थापनात लोण ग्रामपंचायतीला तालुक्यातील प्रथम बक्षीस देण्यात आले. असे अनेकविध बक्षीस सन्मान या ग्रामपंचायत च्या महिलाराज ला मिळाले आहेआता लक्ष स्मार्ट ग्रामच्या पहिल्या बक्षिसाकडेचर्चेत असलेल्या लोण ग्रामपंचायतीचे लक्ष आता जिल्हास्तरीय दिले जाणारे स्मार्ट ग्रामकडे लागले आहे. येथेदेखील लोण ग्रामपंचायत निश्चित प्रथम येईल, असा विश्वास आहे.विविध उपक्रमामुळे लोण ग्रामपंचायतीची चर्चाया ग्रामपंचायतीचे कामकाज पेपरलेस, संपूर्ण गावात एलईडी दिवे, चार चौकात हाईमस्ट लॅम्प, शाळेची आकर्षक इमारत, टँकरमुक्त गाव, गावात दारूबंदी, वृक्ष लागवड, भूमीगत गटारी, सुसज्ज व्यायाम शाळा आदी उपक्रमामुळ असते.ग्रामपंचायतमार्फत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस तसेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना विनाशुल्क आरओचे पाणी दररोज दिले जाते .मोहरम उत्सवगावात एकही मुस्लीम कुटुंब नाही. येथे पिराचे ठाणे आहे. एकही मुस्लीम कुटुंब नसताना दरवर्षी मोहरम उत्सव साजरा करण्यात येत असतो. यात संपूर्ण गाव सहभागी होतो. अशा या महत्वपूर्ण असलेल्या गावाची सत्ता महिलांच्या हाती आहे.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनBhadgaon भडगाव