आॅनलाईन लोकमतअडावद, ता.चोपडा, दि.९ : अतिदुर्गम भागात असलेल्या बोरमळी (ता.चोपडा) शिवारात सलादीबाई पाता पावरा (४०) या आदिवासी महिलेचा खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.बोरमळी (ता.चोपडा) येथील कैलास तडवी पावरा व त्याची पत्नी सिरोटीबाई हे बोरमळी शिवारातील त्यांच्या शेतात ज्वारीचे कणसं मोडणीसाठी गेले होते. बाजूला शेतात असलेल्या सोयाबीनच्या चाºयावर टाकलेली ताडपत्री काढली असता चाºयात पाय दिसले. गावात येवून त्यांनी ही घटना सरपंच जुनाबाई पावरा यांना सांगितली. सरपंच यांचा मुलगा प्रल्हाद पाडवी यांनी सकाळी १० वाजेच्या सुमारास गावाचे पाटील बाबूराव पाडवी यांना ही घटना कळविली. विष्णापुर येथे गेलेले पाटील यांनी तात्काळ बोरमळी गाठले. यानंतर पोलीस ग्रामस्थांसह घटनास्थळी पोहचले.सोयाबीनचा चारा बाजूला केला असता ४० वर्षीय महिलेस ठार मारुन चाºयात टाकून दिले असल्याचे उघड झाले. मृत महिला ही बोरमळी येथील सलादीबाई पाता पावरा असल्याचे निष्पन्न झाले. तिचा पती पाता सोमा पावरा हा बलात्काराच्या गुन्ह्यात नासिक कारागृहात शिक्षा भोगत असल्याचे समजते. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला बाबुराव बुटा पाडवी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यत सुरु होते.
जळगाव जिल्ह्यातील बोरमळी शेतशिवारात महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 12:24 IST
सोयाबीनच्या चाºयाखाली झाकला होता मृतदेह
जळगाव जिल्ह्यातील बोरमळी शेतशिवारात महिलेचा खून
ठळक मुद्देखून करून सोयाबीनच्या चाºयात लपविला मृतदेहमयत महिलेचा पती नाशिक कारागृहातअडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल